Decoration With Live Grenade: उत्सव किंवा एखादा सण असेल तर लोक आपलं घर चांगलं सजवतात. यावेळी लोक लाइट्स, झुंबर आणि शोभेच्या वस्तू लावतात. पण विचार करा जर आपण आपलं घर सजवण्यासाठी हॅन्ड ग्रेनेड बॉम्बचा वापर केला तर नक्कीच सगळेच हैराण होतील. असाच काहीसा कारनामा एका व्यक्तीने केला. त्याने त्याचं घर जिवंत ग्रेनेड बॉम्बने सजवलं.
ही घटना आहे ब्रिटनच्या कॉर्नवालमधील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका माथेफिरू व्यक्तीने असं केलं. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीने बाजारातून काही ग्रेनेडची व्यवस्था केली आणि ते तो घरात सजवण्यासाठी घेऊन आला होता. महत्वाची बाब म्हणजे त्याला हे माहीतच नव्हतं की, सगळे ग्रेनेड जिवंत होते आणि कधीही फुटले असते.
त्याने हे ग्रेनेड घरात लावायला सुरूवात केली. घरातील भिंतीवर, अंगणात आणि छतावर त्याने काही ग्रेनेड लावले. त्याला हे करत असताना शेजाऱ्यांनी पाहिलं आणि त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना धक्का बसला. ते सगळे जिवंत ग्रेनेड होते. त्याचा हा कारनामा पाहून शेजारी तिथून पळाले.
योगायोगाने पोलिसांची एक टीम परिसरात राऊंडवर आली होती. एका शेजाऱ्याने जाऊन पोलिसांना या घटनेबाबत सांगितलं. तेव्हा पोलिसांची टीम या व्यक्तीच्या घरी पोहोचली तर ते सुद्धा हैराण झाले. लगेच बॉम्ब स्क्वॉडची टीम बोलवण्यात आली आणि सगळे जिवंत बॉम्ब नष्ट करण्यात आले. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, त्याने हे बॉम्ब घरात सजवण्यासाठी आणले होते आणि त्याला विश्वासच बसत नाहीये की, ते सगळे बॉम्ब जिवंत होते. आता कुठे शेजाऱ्यांच्या जिवात जीव आला.