एका १० सेकंदाच्या व्हिडीओची किती किंमत असू शकते? तुम्हाला तर कुणी सांगितलं की, एक १० सेकंदाचा व्हिडीओ कोट्यावधी रूपयांना विकला गेला तर विश्वास बसेल का? नाही ना....पण असं घडलंय. हा व्हिडीओ भलेही १० सेकंदाचा असेल पण याच्या लिलावात या व्हिडीओला ६.६ मिलियन डॉलर इतकी किंमत मिळाली आहे. म्हणजे या व्हिडीओला ४८ कोटी ५७ लाख रूपये इतकी किंमत मिळाली आहे. हा व्हिडीओ विकणाऱ्याचं नाव आहे पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राइले. तो मियामीचा राहणारा आहे. त्याने हा व्हिडीओ केवळ ६७ हजार डॉलरला खरेदी केला होता.
का मिळाली इतकी किंमत?
पाब्लो हा व्हिडीओ ऑनलाइनही बघू शकत नाही आणि तोही फ्रीमध्ये. तरी सुद्धा त्याने या व्हिडीओसाठी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ६७ हजार इतकी रक्कम चुकवली होती. आणि आता काही महिन्यांमध्येच त्याने हा व्हिडीओ ६.६ मिलियन डॉलर इतक्या किंमतीला विकला.
हा व्हिडीओ डिजिटल आर्टिस्ट बीपलीने तयार केला होता. त्याचं खरं नाव आहे माइक विंकलमॅन. तो ब्लॉकचेनकडून ऑथराइज्ड आहे. ही ब्लॉकचेन डिजिटल सिग्नेचर जारी करते. ज्यावरून हे समजतं की, एखाद्या प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे. कारण सध्या सर्व जग ऑनलाइन आहे आणि कोणत्याही गोष्टीची कॉपी केली जात आहे. अशात हे माहीत असणं फार गरजेचं आहे की, एखाद्या वस्तूचा मालक कोण आहे. अशात हा १० सेकंदाचा व्हिडीओ महत्वपूर्ण आहे.
कशी मिळाली इतकी किंमत?
मुळात डिजिटल अॅसेट्सची कॉपी आजकाल केली जात आहे. पण नवीन ब्लॉकचेन सिस्टम नॉन फंगीबल टोकन नावाने ओळखलं जातं. हे एनएफटी लॉकडाऊनमध्ये चांगलंच गाजलं. पाब्लो रॉड्रिग्ज-फ्राइले म्हणाला की, ही सिस्टीम पारंपारिक सिस्टीमपेक्षा वेगळी आहे.
या सिस्टीमबाबत तो म्हणाला की, 'तुम्ही मोनालिसाचा फोटो क्लिक करा आणि बाहेरून प्रिंट काढू शकता. अशाप्रकारे मोनालिसाची पेंटींग तुमच्याकडेही राहील. पण ओरिजनल पेंटींग तुमच्याकडे नाहीये. अशात त्याची काही किंमत नाही. एनएफटी हेच काम करतं की, ते खऱ्याची ओळख पटवून देते. आणि हा खरा १० सेकंदाचा व्हिडीओ अनोखा आहे. हा व्हिडीओ बघू तर सगळेच शकतात. पण आपला म्हणून कुणीही किंमत ठरवू शकत नाही. १० सेकंदाच्या या व्हिडीओला ४८.५ कोटी रूपयांची किंमत मिळाली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प जमिनीवर पडले होते तो किस्साही आहे आणि त्यावर खास स्लोगनही आहे.
बातमीतील फोटोही खास
या बातमीतील फोटो बघत असाल तर हा फोटोही अनोखा आहे. हा फोटोही बीपली यानेच तयार केला आहे. या फोटोला लिलावात ३ मिलियन डॉलर मिळण्याची अपेक्षा केली जात आहे. या डिजिटल फोटोचं नाव आहे - EVERYDAYS: THE FIRST 5000 DAYS, जी 5000 फोटोंचं कोलाज आहे. हा फोटो केवळ एनएफटीच्या माध्यमातून विक्रीसाठी उपलब्ध आहे.