Alcohol improves foreign language skills: अल्कोहोल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. दारूमुळे किडनी, लिव्हर खराब होण्यासोबतच हृदयाचंही नुकसान होतं. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, दारू पिणारे लोक फाडफाड इंग्रजी बोलतात, पण इतर वेळी त्यांना तसं बोलणं जमत नाही. याबाबत एका अभ्यासातून खुलासा करण्यात आला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती थोडी जरी दारू प्यायले तर न घाबरता स्पष्टपणे दुसरी भाषा किंवा इंग्रजी बोलू लागतात. भलेही ती भाषा आधी त्यांना नीट येत नसेल तरीही. भारतात ही भाषा इंग्रजी असते.
हा अभ्यास साइकोफर्माकॉलोजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हा अभ्यास यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूल, मॅश्ट्रिच्ट यूनिवर्सिटी आणि किंग्स कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी मिळून केला. यातून समोर आलं की, दारू प्यायल्यानंतर त्यांची मुख्य भाषा सोडून दुसरी भाषा बोलण्याचं स्किल सुधारतं. दारू प्यायल्यानंतर ते दुसरी भाषा फाडफाड बोलतात.
साइंसडेलीमध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार, इंग्रजी किंवा दुसरी एखादी परदेशी भाषा बोलण्यासाठी बौद्धीक क्षमता सजग असणं गरजेचं असतं. अशात आपण हा विचार करू शकतो की, दारू बौद्धीक क्षमता आणखी बिघडवते. पण अभ्यासात याउलट परिणाम समोर आले आहेत.
अभ्यासात आढळून आलं की, दारूमुळे सेल्फ कॉन्फिडन्स अनेक पटीने वाढतो. त्यासोबतच सोशल एंग्जाइटी म्हणजे बऱ्याच लोकांना बघून भीती किंवा अस्वस्थता होत असते, ती सुद्धा दूर होते. या दोन्हीच्या प्रभावामुळे जेव्हा अन्य लोकांसोबत संवाद होतो तेव्हा दुसरी भाषा बोलण्याची क्षमताही वाढते. या स्थितीनंतर जेव्हा दारूची नशा उतरते तेव्हा व्यक्तीला वाटतं की, त्यांची दुसरी भाषा फार सुधारली आहे आणि ते या भाषेत चांगले बोलू शकतात.
अभ्यासकांनी हा अभ्यास नेदरलॅंडमध्ये काही जर्मन मातृभाषा असलेल्या लोकांवर केला. यासाठी त्यांनी या लोकांना कमी प्रमाणात दारू प्यायला दिली. हे लोक डच यूनिवर्सिटीमध्ये अभ्यास करत होते. सगळे जर्मन भाषा बोलत होते आणि नुकतेच डच शिकायला लागले होते. त्यांच्यासोबत काही डच लोकांना बसवण्यात आलं. ते दारू पिऊन नव्हते.
आता लोकांमध्ये संवाद सुरू झाला होता. अभ्यासकांनी त्यांचा हा संवाद रेकॉर्ड केला. जेव्हा संवाद सुरू झाला तेव्हा जर्मन भाषा बोलणारे लोक जे डच भाषा शिकत होते, ते डच लोकांसोबत डच भाषा न अडखळता बोलत होते. नंतर या लोकांना स्वत:ला डच बोलण्यावरून रेटींग देण्यास सांगण्यात आलं. हे सगळेच लोक त्यांची डच भाषा ऐकून हैराण झाले. अशाप्रकारे त्यांची डच बोलण्याची क्षमता वाढली.