शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

शून्य मोजून दमाल, पण मुंग्या नाही! शास्त्रज्ञांनी या टेक्निकने मोजल्या पृथ्वीवरील मुंग्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 7:18 PM

पृथ्वीवर सुमारे 800 दशलक्ष मानव राहतात. पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे.

तुम्ही कधी पृथ्वीवर मुंग्यांच्या संख्या किती असेल याबद्दल विचार केला आहे का? पृथ्वीवर किती मुंग्या राहतात? याचा कोणी विचारही केला नसेल असे खात्रीने म्हणता येईल. पण आता शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर असलेल्या मुंग्यांची संख्या शोधून काढली आहे. अंदाजे आकडेही काढले आहेत. संख्या इतकी जास्त आहे की शून्य मोजता मोजता दिवसही निघून जाईल. परंतु ही संख्या मानव किंवा इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा हजारो किंवा लाख पट जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला आहे. त्यांनी केलेल्या मोजणीनुसार, संपूर्ण जगात 20 क्वाड्रिलियन (20 Quadrillion) मुंग्या आहेत. सामान्य भाषेत सांगायचे झाले तर 200 लाख कोटी. जर तुम्हाला संख्या आणि शून्य पहायचे असतील तर स्वतःच हे मोजून पाहा. पृथ्वीवर 20,000,000,000,000,000 मुंग्या आहेत. या मुंग्या मिळून 12 दशलक्ष टन ड्राय कार्बन तयार करतात. इतका कार्बन, पृथ्वीवरील सर्व पक्षी आणि सस्तन प्राणी मिळूनही ते तयार करत नाहीत. ड्राय कार्बनचे वजन पृथ्वीवरील मानवाच्या वजनाच्या एक पंचमांश आहे.

मानव निसर्गाचा समतोल राखतो. बऱ्याच वर्षांपूर्वी, प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ एडवर्ड ओ विल्सन यांनी कीटकांबद्दल सांगितले होते की केवळ लहान जीवच संपूर्ण जगावर राज्य करतात. ते बरोबर आहेत असे दिसते. मुंग्या हा निसर्गाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते जमिनीतील हवेची पातळी राखतात. त्या बियादेखील इकडून तिकडे नेण्याचं काम करतात. त्या अन्न साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

१५,७०० पेक्षा अधिक प्रजातीमुंग्यांची संख्या आणि त्यांच्याद्वारे तयार झालेल्या ड्राय कार्बनचे प्रमाण तपासल्यास पृथ्वीवर किती हवामान बदल होत आहेत हे कळू शकते. पृथ्वीवर मुंग्यांच्या 15,700 प्रजाती आणि उपप्रजाती आहेत. अशा अनेक प्रजाती आहेत ज्यांच्या प्रजातींना अद्याप कोणतेही नाव दिलेले नाही. त्यांची सामाजिक रचना, परस्पर समन्वय, लयबद्ध पद्धतीने काम करणे आणि एकमेकांची काळजी घेणे अशा अनेक गोष्टी शिकवतात. ते जगभरातील इकोसिस्टम तयार करण्यात आणि संतुलित करण्यात मदत करतात.

पृथ्वीवर किती मुंग्या आहेत हे जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र योग्य पद्धत व पुराव्याअभावी नेमका आकडा कळू शकला नाही. शास्त्रज्ञांनी इंग्रजी नसलेल्या साहित्याचाही अभ्यास केला. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, रशियन, मँडरिन आणि पोर्तुगीज भाषेतील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. एकूण, मुंग्यांच्या संख्येवर केलेले 498 अभ्यास वाचल्यानंतर, शास्त्रज्ञांनी या मुंग्यांची गणना केली.

अनेक शास्त्रज्ञ आले एकत्रहा अभ्यास करण्यासाठी जगभरातील अनेक विद्यापीठे आणि वैज्ञानिक संस्थांचे शास्त्रज्ञ एकत्र आले. कारण मानवी लोकसंख्या सुरक्षित ठेवायची असेल तर मुंग्यांची संख्या जाणून घेणे गरजेचे आहे. कारण मुंग्या मोजून पृथ्वीवर होणारे मोठे हवामान बदल शोधणे सोपे जाते. त्याचे कारण असे आहे की जगभरातील मानवी क्रियाकलापांमुळे कीटकांची संख्या कमी होत आहे. त्याचे वास्तव्य संपुष्टात येत आहे. याचे कारण जमिनीचा योग्य वापर न होणं, रसायनांचा वापर, हवामान बदल हेदेखील आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेEarthपृथ्वी