या फोटोने इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना पार कंफ्यूज करून टाकले आहे. कारण या फोटोत आपल्याला केवळ 4 हत्ती दिसत असतील, तर चुकीचे आहे. तुम्हाला आणखी व्यवस्थित बघण्याची गरज आहे. हा फोटो एका IFS अधिकाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत तुम्हाला किती हत्ती दिसतात, असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला आहे. यावर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. काही लोक म्हणतायत 5 हत्ती दिसत आहेत, तर काही लोक म्हणतायत 7 हत्ती दिसत आहेत. पण तुम्हाला किती हत्ती दिसत आहेत.
तुम्हाला फक्त 4 हत्तीच दिसत आहेत?हा फोटो भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) सुशांता नंदा यांनी 19 जानेवारीला शेअर केला आहे. त्यांनी सोशल मीडिया युजर्सना प्रश्न केला आहे की, या फोटोमध्ये किती हत्ती आहेत? या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बातमी लिहेपर्यंत या ट्विटला 2 हजारांहून अधिक लाईक्स आणि 160 वर रिट्विट्स मिळाले आहेत.
लक्ष देऊन बघा, 7 हत्ती आहेत फोटोत?भलेही आपल्याला विश्वास बसणार नाही, पण या फोटोत एकूण 7 हत्ती आहेत. खरे तर हा फोटो 'वाइल्डलेन्स इको फाउंडेशन' (@WildLense_India) ने ट्विटरवर शेअर केला आहे. ते म्हणाले हा क्षण कैद करण्यासाठी जवळपास 1400 फोटो घेण्यात आले! फोटोग्राफरने एक ऐसे फ्रेम बनवले की, सर्वच्या सर्व 7 हत्ती फोटोत पाणी प्याताना आले.
काय, आहेत ना संपूर्ण 7 हत्ती... -फोटोग्राफरने हत्ती पाणी पीत असतानाचा क्षण तर टिपलाच, पण त्या क्षणाचा व्हिडिओही चित्रित केला आहे. जेव्हा लोकांना फोटोमध्ये 7 हत्ती दिसले नाही, तेव्हा फोटोत 7 हत्ती आहेत हे सिद्ध करण्यासाठी 'वाइल्डलेन्स इंडिया'ने हा व्हिडिओ शेअर केला. ही गोष्ट वेगळी की, ते दिसणे सर्वांनाच शक्य नाही. कारण हा फोटोच असा घेण्यात आला आहे की, इतर हत्ती एक-मेकांच्या मागे लपले आहेत.