पावसाला सुरूवात झाली की, डासांचा त्रास वाढतो. या दिवसात सगळीकडे हिरवळ असते. पावसासोबत अनेक आजारही येतात. मलेरिया, डेंग्यू पसवणारे डास जागोजागी वाढतात. जिथे पाणी जमा होतं आणि ते स्वच्छ केलं जात नाही किंवा काढलं जात नाही तिथे हे डास वाढतात. मग घराघरात शिरून लोकांना आपले शिकार करतात.
सामान्यपणे सांयकाळी आणि रात्री डास हल्ला करतात. आपलं रक्त पिऊन ते लगेच उडून जातात. डास चावल्यावर त्वचेवर पुरळ येते. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दाखवण्यात आलं आहे की, डास मनुष्यांना कसे चावतात. यात डासांची चावण्याची पूर्ण प्रॉसेस दाखवण्यात आली आहे.
डासांच्या शरीरात 6 नीडल्ससारखे स्ट्रक्चर असतात. यांच्या मदतीनेच डास रक्त पितात. डास एक नीडलच्या माध्यमातून मनुष्याच्या शरीरात एनेस्थीशियासारखं लिक्विड सोडतात. म्हणजे जोपर्यंत त्यांना समजतं की, तुम्हाला डास चावत आहे. तोपर्यंत डास आपलं काम पूर्ण करतात. एक डास एक मिनिटात मनुष्याच्या शरीरातून दीड एमएल रक्त पितात. केवळ मादा डासाच मनुष्याचं रक्त पितात. नर डास हे फुलांचा रस पितात.
जोपर्यंत मनुष्याला जाणीव होतो की, डास त्यांना चावत आहेत तोपर्यंत रक्त पायल्याने त्वचेवर सूज येते. हे डास त्यांच्या शरीरातील असलेल्या नीडलपैकी एक नीडलने असं केमिकल आत टाकतात. ज्याने ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताच्या गाठी होतात.
यानंतर एका नीडलच्या मदतीने मलेरिया आणि डेंग्यूचे व्हायरस मनुष्याच्या शरीरात सोडतात. या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. याद्वारे लोकांना पावसाळ्यात काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून आजारांपासून वाचता येईल.