उन्हाळा सुरू झाला की, लोक भरपूर कोल्ड ड्रिंक पितात. तापत्या उन्हामुळे आणि घामांच्या धारांमध्ये याने लोकांना एक वेगळा थंडावा मिळतो. पण जे लोक कोल्ड ड्रिंक पितात त्यांनाही याच्याबाबत फार कमी गोष्टी माहीत असतात. जसे की, हे बनवण्यासाठी किती पाणी आणि साखर लागते. तसं तर कोल्ड ड्रिंक पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. याबाबत डॉक्टरही वेळोवेळी सल्ला देत असतात. पण एक माहिती म्हणून आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत.
कोल्ड ड्रिंक वेगवेगळ्या फ्लेवर्स मिळतात. जे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. उन्हाळ्यात यांची विक्री वाढते. अशात आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, एक लीटर कोल्ड ड्रिंक बनवण्यासाठी किती पाणी आणि साखरेचा वापर केला जातो.
कोल्ड ड्रिंकबाबत वेगवेगळे रिपोर्ट समोर येत असतात. अशाच एका रिपोर्टनुसार, आता एक लीटर कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी जवळपास अडीच लीटर पाणी लागतं.
तर बिजनेस स्टॅंडर्डच्या एका रिपोर्टनुसार, एक लीटर कोल्ड ड्रिंक बनवण्यासाठी जवळपास 4 लीटर पाणी लागतं. तसेच कोल्ड ड्रिंकमध्ये सगळ्यात जर काही असेल तर ती असते साखर. कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी खूप जास्त सारखेचा वापर केला जातो.
कोक बनवण्यासाठी आणखीही काही गोष्टी लागतात. ज्यात साखर, पाण्यासोबतच कॅफीन, कोकाची पाने आणि कॉर्न सिरपही लागतं. तेच एक लीटर कोकमध्ये 110 ग्राम कार्बोहाइड्रेट असतात. त्याशिवाय कोल्ड ड्रिंकमध्ये ग्लूकोज आणि फ्रुक्टोज नावाच्या दोन प्रकारची शुगर आढळते.