पूर्वी वाहतूक पोलीस दुचाकी अथवा कार थांबवून त्यांची पावती फाडायचे. मात्र आता फोटो काढून पावती फाडतात. पण, पोलीस एवढ्या पटकन फोटो कसे काढतात? याचा आपण कधी विचार केला का? फोटो क्लिक करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. हाताची थोडीशीही हालचाल झाली, तर फोटो ब्लर होतो. पण ट्रॅफिक मध्येही अथवा गाडी भरधाव असतानाही पोलीस क्लिअर फोटो कसा क्लिक करतात? काही रिपोर्ट्सनुसार, यासाठी पोलीस काही ट्रिक वापरतात, तर जाणून घेऊयात? हाई-रेजोल्यूशन कैमरा: अनेक लॉ एंफोर्समेंट एजन्सीज अॅडव्हान्स कॅमेऱ्याचा वापरतात.ते हाय-रिझॉल्यूशनचे असतात. यांद्वारे डिटेल्ड फोटो कॅप्चर केला जाऊ शकतो. यात नंबर प्लेट अत्यंत क्लिअर दिसते.
ट्रॅफिक एंफोर्समेन्ट कॅमेरा - काही ठिकाणी फिक्सड अथवा मोबाइल ट्रॅफिक एंफोर्समेंट कॅमेरे इंस्टॉल केलेले असतात. हे कॅमेरे गाड्यांचा फोटो ऑटोमॅटीकली घेतात. गे कॅमेरे इंटरसेक्शनच्या ठिकाणी लावले जातात. गाडीची इमेज क्लिअर यावी, अशा पद्धतीने ते डिझाइन केलेले असतात. हे कॅमेरे रात्रीच्या वेळीही चांगल्या पद्धतीने फोटो क्लिक करू शकतात.
समोर उभे राहणे - ट्राफिक पोलस अनेक वेळा थेट गाडी समोर जाऊन उभे राहतात. यामुळे त्यांना अतिशय क्लिअर फोटो मिळतो. एवढेच नाही, तर असेही बोलले जाते की, फोटो घेतल्यानंतर, लॉ एंफोर्समेंट एजेन्सीज स्पेशल सॉफ्टवेअरच्या सहाय्याने इमेज अधिक क्लिअर करते. यामुळे नंबर प्लेट क्लिअर होते.