शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

रेल्वेच्या डब्यावरील 'या' कोडचा अर्थ तुम्हालाही नसेल माहीत, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:35 PM

Railway Unique Code Meaning : तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो. पण याचा अर्थ काय आहे?

Railway Unique Code Meaning : रेल्वेने प्रवास करणं आजकाल कॉमन झालं आहे. लाखो लोक रोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे प्रवास हा स्वस्त आणि सुविधाजनक ठरतो. तसेच या प्रवासाने एक वेगळा अनुभवही मिळतो. बरेच लोक रेल्वेने प्रवास करतात पण त्यांना रेल्वेच्या अनेक गोष्टी माहीत नसतात. अशीच एक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलं असेल की, रेल्वेच्या डब्यावर बाहेरील बाजूस एक 5 अंकी नंबर लिहिलेला असतो.

हा नंबर पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, या नंबरचा अर्थ काय आहे? किंवा हा कशासाठी लिहिला असेल? मोजक्याच लोकांना या नंबरचा अर्थ माहीत असेल. अशात आज आम्ही तुम्हाला या नंबरचा अर्थ सांगणार आहोत. 

रेल्वेच्या डब्यावर हा 5 अंकी नंबर ठळकपणे लिहिलेला असतो. याच्या सुरूवातीच्या 2 आकड्यांवरून या रेल्वेच्या निर्माणाचं वर्ष म्हणजे ही रेल्वे कधी तयार करण्यात आली हे कळून येतं.

उदाहरणार्थ 03230 चा अर्थ होतो रेल्वेचा हा कोच 2003 मध्ये निर्मित कोच आहे, 07052 चा अर्थ होतो 2007 मध्ये निर्मित कोच किंवा 97132 चा अर्थ 1997 मध्ये निर्मित कोच होतो.

आता तुम्ही विचार करत असाल की, सुरूवातीच्या दोन आकड्यांबाबत तर सांगितलं. आता उरलेल्या तीन क्रमांकाचा काय अर्थ आहे? चला जाणून घेऊ पुढच्या तीन क्रमांकाचा अर्थ काय आहे.

001 - 025 : AC प्रथम श्रेणीवर, वर्ष 2000/2001 मधील काही डबे किंवा कोच

026 - 050 : 1 AC + एसी - 2 टी

051 - 100 : AC - 2T म्हणजे एसी 2 टीअर

101 - 150 : AC - 3T म्हणजे एसी 3 टीअर

151 - 200 : CC म्हणजे एसी चेअर कार

201 - 400 : SL म्हणजे द्वितीय श्रेणी स्लीपर

401 - 600 : GS म्हणजे सामान्य द्वितीय श्रेणी

601 - 700 : 2S म्हणजे द्वितीय श्रेणी सिटींग/जनशताब्दी चेअर कार

701 - 800 : SLR सिटींग कम लगेच रॅक

801+ : पॅंटी कार, व्हिपीयू, आरएमएस मेल कोच, जनरेटर कार इत्यादी....

ज्या रेल्वेचा पहिला नंबर 0 ने सुरू होतो, ती रेल्वे स्पेशल रेल्वे असते. या सामान्यपणे होळीच्या वेळी किंवा उत्सवात चालतात. तेच एसी रेल्वेंबाबत सांगायचं तर त्यांची सुरूवात 1 नंबरने होते. या रेल्वे कमी अंतरावर चालणाऱ्या असतात. त्याऐवजी नंबर 2 असलेल्या रेल्वे जास्त लांब पल्ल्याच्या असतात.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वे