देशातील जास्तीत जास्त भागांमध्ये तापमान खूपच वाढलं आहे. अशात लोक गरमीमुळे हैराण झाले आहेत. लोक थंड पाणी पिऊन शरीर थंड करण्याचा प्रयत्न करतात. जास्तीत जास्त लोक फ्रीजमधील थंड पाणी पितात. तर काही लोक मडक्यातील पाणी पितात. पण अनेकदा मडक्यातील पाणी थंड होत नाही. अशात एका महिलेने एक व्हिडीओ शेअर करून मडक्यातील पाणी कसं थंड ठेवायचं याच्या टिप्स दिल्या आहेत. मडक्यातील पाणी पिणं फार फायदेशीर आहे. ही पद्धत वापरून तुम्ही मडक्यातील पाणी अधिक थंड करू शकता.
Priya Gupta नावाच्या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एक मटका स्वच्छ करण्याची आणि त्यातील पाणी थंड ठेवण्याची पद्धत सांगत आहे. ही महिला सांगते की, सगळ्यात आधी मडकं पाण्याने धुवून घ्या. नंतर मडकं पूर्ण पाण्याने भरा आणि त्यात थोडं मीठ टाकून रात्रभर तसंच ठेवा. त्यानंतर ते पाणी टाकून पुन्हा त्यात साधं पाणी भरा आणि भिजवलेल्या वाळूवर ते ठेवा. त्यानंतर त्यावर थोडी तुरटी फिरवा.
या व्हिडीओवर बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. काही लोक म्हणाले की, तुरटीमध्ये मडक्यातील पोर्स कसे बंद होतील. तेच काही लोक म्हणाले की, मडक्यातून पाणी पाझरलं तेव्हाच पाणी जास्त थंड राहतं.