इंद्रधनुष्य आता नशीबाचीच बाब झाली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि रोजच्या धावपळीच्या लाइफमध्ये आपण अनेकदा निसर्गाच्या सौंदर्याचं कौतुक करायलाच विसरतो. निसर्गाकडे जर बारकाईने पाहिलं जर प्रत्येक बदलत्या क्षणाला मनात साठवता येऊ शकतो. एका रिपोर्टनुसार, इंग्लंडमध्ये निसर्गाचा एका अनोखा नजारा बघायला मिळाला.
(Image Credit : bbc.com)
इंग्लंडच्या Dorset, Somerset आणि Gloucestershire मध्ये सोमवारी सायंकाळी गुलाबी इंद्रधनुष्य दिसला. BBC चे हवामानाचे तज्ज्ञ Lan Boutland यांच्यानुसार, 'सांयकाळी दिसणारा हा इंद्रधनुष्य गुलाबी दिसतो. असं सूर्याच्या अॅंगलमुळे होतं'.