साधारणपणे रस्त्यावर राहणाऱ्या कुत्र्यांचं काही भविष्य नसतं. त्यांना खायला मिळालं तर जगतात नाही तर काही वर्षात मरतात. काही कुत्रे तर अपघातात आपला जीव गमावतात नाही तर काही लोक त्यांना मारतात. पण रस्त्यावरील एका कुत्र्याचं नशीब फारच चमकलंय. या कुत्र्याला ह्युंदाई शोरूममध्ये सेल्समनचं काम मिळालं आहे.
आधीच जो कुत्रा शोरूम बाहेर फिरत होता. आता तोच कुत्रा शोरूमच्या आत सेल्समन म्हणून काम करणार आहे. यासाठी त्याला एक आयकार्डही देण्यात आलं आहे.
ही घटना आहे ब्राझीलमधील. येथील कार निर्मिती कंपनी ह्युंदाईने टक्सन नावाच्या कुत्र्याला आपलं सेल्समन बनवलं आहे. आधी हा कुत्रा ह्युंदाई शोरूमचया बाहेर फिरत होता. हळूहळू तो शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच मिसळला. त्याचं चांगलं वागणं पाहून शोरूममधील लोकांनी त्याला आपल्यासोबत जोडलं. इतकेच नाही तर त्याचं प्रॉपर आयडी कार्डही बनवलं.
ह्युंदाई ब्राझीलने त्याचा फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, ह्युंदाई प्राइम डीलरशिपमध्ये सेल्स डॉग टक्सन प्राइमला भेटा. या नव्या सदस्याचं वय आहे १ वर्षे. ह्युंदाई परिवार याचं स्वागत करतो. हा आधीपासूनच शोरूममधील कर्मचाऱ्यांशी आणि ग्राहकांसोबत चांगला व्यवहार करत होता.
डॉग टक्सनचं शोरूमच्या आतच एक आपलं कॅबिन आणि घर आहे. तो शोरूमच्या मीटिंगमध्येही सहभागी होतो. इतर लोकांप्रमाणे तो कामही करतो. सध्या शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांचं लक्ष त्याने आकर्षित केलं आहे. शहरात तो चर्चेचा विषय ठरला आहे. लोक शोरूमचं कौतुक करत आहेत. कारण शोरूमने एका रस्त्यावरील कुत्र्याला इतका मान दिला.
हे पण वाचा :
Video : भारीच! भूकेलेल्या मोरानं भाजीवाल्या आजीकडे घेतली धाव; अन् या आजीने 'अशी' भागवली भूक
लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!