पहिल्या रात्रीच पत्नीबाबत झाला धक्कादायक खुलासा, लग्नाच्या तीन महिन्याआधी तिने....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 11:00 AM2023-04-13T11:00:47+5:302023-04-13T11:02:07+5:30
पतीने पत्नीला या टाक्यांबाबत विचारलं तर तिने त्याला काही बरोबर उत्तर दिलं नाही. जेव्हा याबाबत चौकशी केली गेली तेव्हा नवरदेवाला मोठा धक्का बसला.
लग्नाबाबत तरूण आणि तरूणी यांनी अनेक स्वप्ने रंगवलेली असतात. लग्न यादगार करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. खासकरून लग्नाच्या पहिल्या रात्रीचं खास प्लानिंग केलं जातं. पण काही लोकांच्या स्वप्नांवर लग्न होताच पाणी फेरलं जातं. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या शिवपुरीमधून समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेव मोठ्या आनंदाने आपल्या नवरीजवळ गेला. इतक्यात त्याला नवरीच्या पोटावर 7 ते 8 टाक्याचे निशाण दिसले. जे बघून त्याचा चेहराच पडला.
पतीने पत्नीला या टाक्यांबाबत विचारलं तर तिने त्याला काही बरोबर उत्तर दिलं नाही. जेव्हा याबाबत चौकशी केली गेली तेव्हा नवरदेवाला मोठा धक्का बसला. पत्नीच्या पोटावरील टाक्यांचं रहस्य जेव्हा पतीला समजलं तेव्हा तो हैराण झाले. पीडित पतीने सांगितलं की, लग्नाच्या साधारण तीन महिन्यांआधी त्याच्या पत्नीने अबॉर्शन केलं होतं.
लपवून ठेवली होती बाब
तरूणाने सांगितलं की, ही गोष्ट नवरीकडील लोकांनी लपवून ठेवली होती. त्यांनी सांगितलं की, जर त्याला समजलं असतं की, नवरी लग्नाआधीच गर्भवती झाली होती तर त्याने तिच्याशी लग्न केलं नसतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीच पत्नीचा भांडाफोड झाल्याने पतीने तिला माहेरी परत पाठवलं. ती सुद्धा परत आली नाही. या घटनेने केवळ तरूणाच्या परिवारालाच नाही तर लोकांनाही धक्का बसला आहे.
हॉस्पिटलमधून काढली माहिती
पीडित पतीने माहितीच्या अधिकाराचा वापर करत हॉस्पिटलमधून पत्नीबाबत माहिती मिळवली. तेव्हा समोर आलं की, महिलेने लग्नाच्या तीन महिन्यांआधी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अबॉर्शन केलं होतं. यावरून हे स्पष्ट झालं होतं की, तरूणीचे कुणासोबत तरी संबंध होते. ती तिच्या प्रियकराकडून गर्भवती झाली होती. अशात तिचं लग्न जुळलं आणि तिला अबॉर्शन करावं लागलं. आता पत्नीचं हे सत्य समोर आल्यावर पतीला काय करावं हे कळत नाहीये.
पत्नीनेच केली केस
पत्नीचं सत्य समोर आल्यावर तिला माहेरी पाठवलं तर तिच्या माहेरच्या लोकांनी उलटी पतीवरच पालन-पोषणाचा खर्च देण्याची केस दाखल केली आहे. यामुळे तो अजून टेंशनमध्ये आला आहे. पीडित पतीचा आरोप आहे की, त्याला मारहाणही करण्यात आली आहे. ज्यामुळे तो घाबरला आहे.