छोट्या छोट्या गोष्टींवरून घटस्फोट घेतल्याच्या घटना नेहमीच ऐकायला मिळतात. पण चीनमधीलघटस्फोटाचा एक फारच अनोखा किस्सा समोर आला आहे. अनोखा यासाठी कारण नव्या नवरीने केवळ याकारणाने घटस्फोटाची मागणी केली कारण तिचा पती तिच्यासाठी छोटी ब्रा घेऊन आला होता. पतीकडून झालेल्या या छोट्या चुकीमुळे पत्नी संतापली आणि तिने मोठा गोंधळही घातला. सोशल मीडियावर या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
पार्टीमध्ये गोंधळ
चीनचा दक्षिण-पश्चिम भागातील गुइझाउ प्रांतात राहणारी लुओ आणि यांग यांचं नुकतंच लग्न झालं होतं. लग्नानंतर पाहुण्यांसाठी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान अचानक पती आणि पत्नीत भांडण सुरू झालं. रागावलेल्या नवरीने हॉलमधील लाइट बंद केले आणि जोरजोरात ओरडत पतीला घटस्फोट मागू लागली होती. आधी तर लोकांना काही समजलं नाही. पण जेव्हा सर्वांना कारण समजलं तेव्हा सर्व लोक चक्रावून गेले.
आता असं आहे तर पुढे काय?
झालं असं की, नवरदेवाने नवरीला ब्रा गिफ्ट केली होती जी दोन साइज लहान निघाली. त्यामुळे नवरीचा पारा चढला आणि तिने हा तिचा अपमान असल्याचं मानलं. पत्नी म्हणाली की, पतीला माझी साइज माहीत होती. पण तरी तो छोटी ब्रा घेऊन गिफ्ट म्हणून घेऊन आला. तो आताच असं करत आहे तर पुढे माझा सांभाळ कसा करेल. सेलिब्रेशन सुरू असताना झालेल्या या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
परिवाराने केलं मुलीचं समर्थन
मुलीच्या परिवाराने आपल्या मुलीचं समर्थन केलं. ते म्हणाले की, मुलीने रागावण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, नवरदेवाकडून होणार असलेल्या दुसऱ्या पार्टीत ते सहभागी होणार नाहीत. दुसरीकडे पती म्हणाला की, त्याने चुकून लहान साइजची ब्रा आणली. त्याने मुद्दाम असं केलेलं नाही. इतक्या छोट्या गोष्टीवरून इतका गोंधळ करण्याची काहीच गरज नाही.