शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

'व्हॅलेंटाइन डे'ला पतीनं लॉटरीचं तिकीट दिलं म्हणून पत्नी झाली नाराज, पण त्यामुळंच जिंकले 10 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:32 AM

Virginia man gifts wife winning $10M lottery ticket for Valentine's Day : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतो. त्यात फुले, चॉकलेट, टेडी आदींचा समावेश आहे. मात्र मारियाच्या पतीने तिला लॉटरीचे तिकीट गिफ्ट दिले होते.

कुणाचे नशीब कधी बदलेल, हे सांगता येत नाही. असेच काहीसे हेमार्केटमधील एका महिलेच्या बाबतीत घडले आहे. हेमार्केटमध्ये राहणाऱ्या मारिया चिकासला (Maria Chicas) तिच्या पतीने व्हॅलेंटाईन डेनिमित्त लॉटरीचे तिकीट गिफ्ट म्हणून दिले होते. दरम्यान, व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला खास भेटवस्तू देतो. त्यात फुले, चॉकलेट, टेडी आदींचा समावेश आहे. मात्र मारियाच्या पतीने तिला लॉटरीचे तिकीट गिफ्ट दिले होते. व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी पतीकडून गिफ्ट म्हणून लॉटरीचे तिकीट मिळाल्याने मारियाला आनंद झाला नाही, तर तिला पतीचा राग आला. त्यावेळी मारियाला तो कागदाचा तुकडा वाटत होता, कारण याआधीही तिच्या पतीने लॉटरीचे तिकीट काढले होते. पण पतीला कधीही लॉटरी लागली नाही. पतीने मारियाला लॉटरी गिफ्ट दिल्यावर ती खूप नाराज झाली होती, मात्र आता त्याच तिकीटामुळे दोघांचेही नशीब बदलले आहे.

पतीने दिलेल्या लॉटरीच्या तिकिटातून 10 कोटी रुपये जिंकल्याने मारियाचा आनंद आता गगनाला भिडला आहे. जेव्हा लॉटरी लागली आणि बक्षिसाची रक्कम समोर आली, तेव्हा तिच्या पतीलाही विश्वास बसला नाही. मात्र, नंतर दोघांनाही खूप आनंद झाला. दरम्यान, मारियाने व्हर्जिनिया लॉटरीचे तिकीट (Virginia Lottery ticket) जिंकले, ज्याची रक्कम 10 कोटी रुपये होती.

मारियाने सांगितले की, जेव्हा तिला लॉटरी लागली तेव्हा तिचा विश्वास बसत नव्हता. याबाबतची माहिती तिच्या पतीने तिला दिली. याबाबत पतीने सांगितल्यावर मारियाला पती आपल्याला खोटे बोलत असल्याचे सांगितले. पण, खरोखर लॉटरी जिंकल्याचे कळल्यानंतर तिचा आनंदाला पारावार राहिला नाही. दरम्यान, व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवस आधी तिच्या पतीने हे लॉटरीचे तिकीट मानससमधील 9103 मॅथिस एव्हेन्यू येथील इन अँड आउट मार्टमधून खरेदी केले होते, असे मारियाने सांगितले. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके