सिव्हिल सेवेत निवड होण्यासाठी आधी आएएसची परीक्षा आणि नंतर मुलाखत द्यावी लागते. यातील प्रश्न फार चर्चेत राहतात. यूपीएससी प्री आणि मेन्सचा डोंगर पार केल्यावर मुलाखतीत विद्यार्थ्यांना काहीही विचारलं जाऊ शकतं. ही मुलाखत क्रॅक करण्यात चांगले चांगले बेहाल होतात. त्यामुळे याचा खूप जास्त अभ्यास करावा लागतो.
सिव्हिल सेवा मुलाखतीत पास होण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. संघ लोक सेवा आयोगाच्या मुलाखतीची तयारीही खूप जास्त चांगली करावी लागते. मुलाखतीत किंवा परिक्षेत काही ट्रिकी प्रश्न म्हणजे तुम्हाला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. असेच काही ट्रिकी प्रश्न आणि त्यांची उत्तरे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
प्रश्न - तुम्ही केवळ २ चा वापर करून २३ कसे लिहू शकता?उत्तर - २२+२/२
प्रश्न - एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या आणि बकऱ्या आहेत. जर सर्वांची ९० डोकी आणि २२४ पाय आहेत तर बकऱ्यांची संख्या किती झाली?उत्तर - २२ बकऱ्या असतील.
प्रश्न - त्या मंदिराचं नाव काय आहे जे दिवसातून दोनदा गायब होतं?उत्तर - श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर
प्रश्न - असा कोणता दुकानदार आहे जो तुमच्याकडून मालही घेतो आणि त्याचे पैसेही घेतो?उत्तर - न्हावी
प्रश्न - तुम्ही एक कच्च अंड कठोर सरफेसवर कसं सोडाल की, ते क्रॅक होऊ नये?उत्तर - कठोर सरफेस अंड खाली पडून फुटणार नाही. अंड कसंही खाली सोडा...
प्रश्न - एका महिलेला ९ मुलं आहेत. ज्यातील अर्धे मुलगे आहेत. असं कसं होऊ शकतं?उत्तर - १ महिला आणि ९ मुलं एकूण १० लोक झाले. यातील ५ मुलगे आहेत आणि ५ मुली आहेत. प्रश्न - भारतातील कोणत्या राज्यातील मुली सर्वात उंच असतात?उत्तर - यावर एका उमेदवाराने उत्तर दिलं. तसा तर लोक विचार करतात की, पंजाबच्या मुली सर्वात उंच असतात. पण एका रिसर्चनुसार, जम्मू-काश्मीरच्या मुली सर्वात उंच असतात. येथील महिला १५४ सेमी पेक्षा अधिक उंच असू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर हरयाणा आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब व राजस्थानच्या मुली सर्वात उंच आढळून आल्या आहेत. हे उत्तर ऐकून अधिकारीही हैराण झाले होते.
प्रश्न - कोणत्या प्राण्याचं दूध गुलाबी रंगाचं असतं?उत्तर - पाणघोड्याच्या(Hippopotamus) दुधाचा रंग गुलाबी असतो.
प्रश्न - एका मुलीला विचारण्यात आला होता की, तुमच्या शरीराचा कोणता भाग जास्त गरम किंवा उष्ण असतो?उत्तर - शरीराच्या ज्या अवयवात रक्तप्रवाह जास्त वेगाने होतो तो भाग सर्वात जास्त गरम असतो.