एका हॉस्पिटलमध्ये ११ नर्स एकाचवेळी गर्भवती राहिल्याने खळबळ माजली आहे. इतकेच नाही तर यातील २ नर्सची डिलिव्हरी तारीख एकच आहे. या सर्व नर्स जुलै ते नोव्हेंबर महिन्यात बाळांना जन्म देणार आहे. मात्र एकाचवेळी या सर्व नर्स गरोदर कशा राहिल्या यावरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी हॉस्पिटलच्या पाण्यात काही तरी मिसळल्याने हे झाल्याचा हास्यास्पद दावाही केला आहे. परंतु सध्या सोशल मीडियात या गर्भवती महिलांचे फोटो व्हायरल होत आहेत.
हे प्रकरण अमेरिकेच्या मिजूरी राज्यातील आहे. याठिकाणी लिबर्टी हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी १० नर्स आणि १ डॉक्टर गरोदर राहिली आहे. नोव्हेंबरपर्यंत या सगळ्या महिला बाळांना जन्म देणार आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण स्टाफ ऑब्सटेट्रिक्स, लेबर आणि डिलीवरी विभागात काम करत होत्या. Fox4 KC वृत्तवाहिनीशी या विभागाचे प्रमुख निकी कोलिंग म्हणाल्या की, या सर्व बहुतांशवेळा एकत्र काम करत होत्या. परंतु याआधी कधी एकाचवेळी ११ महिला गर्भवती राहिल्या नव्हत्या. लेबर आणि डिलीवरी विभागात करणारी नर्स केटी बेस्टजेनची डिलीवरी २० जुलै तर ऑब्सटेट्रिक्स विभागात काम करणाऱ्या थेरेस बायरम यांची डिलीवरी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
तर २९ वर्षीय हन्ना मिलरनं सांगितले की, याठिकाणी अनेक नर्स अशा आहेत ज्यांनी या हॉस्पिटलचं पाणी पिणार नाही असं म्हटलं आहे. एका रात्री एक नर्स पाण्याची बॉटल घेऊन आली होती. त्यानंतर मी तिच्यावर खूप विनोद केले. तसेच एकाच विभागात काम करणाऱ्या नर्स एकाचवेळी गरोदर होणं हे खूप युनिक आहे असं दुसऱ्या मुलाच्या डिलीवरीची वाट पाहणाऱ्या डॉ. एन्ना गोरमैन यांनी म्हटलं आहे.
एकाचवेळी या नर्स गरोदर राहिल्याने अनेकांमध्ये याची चर्चा सुरू आहे. मात्र या सर्व नर्स या गोष्टीचा आनंद घेत आहे. गर्भवती राहिल्याने सहकाऱ्यांशी बोलून सल्ला मसलत करण्यासाठी त्यांना मदत होत आहे. बर्न्स नावाची नर्स म्हणाली की, एकावेळी आम्ही सगळ्या गरोदर असल्याने त्याचा फायदा होतो. काही अडलं तरी एकमेकींशी चर्चा करता येते. तर हा खरोखर चांगला योगायोग आहे. आमच्या सगळ्यांचे नातं एकमेकींसोबत खूप घट्ट आहे. आम्ही एकमेकांना सहकार्य करतो. आतापर्यंतचा आम्हाला आलेला अनुभव खूप चांगला आहे असं एलेक्सा यांनी म्हटलं.
महत्त्वाचे म्हणजे असा योग पहिल्यांदाच घडतोय असं नाही तर २०१९ मध्ये एकाचवेळी ९ नर्स गर्भवती राहिल्या होत्या. २०१९ मध्ये मेन मेडिकल सेंटरच्या डिलीवरी विभागात काम करणाऱ्या ९ नर्स गरोदर होत्या. तर २०१८ मध्येही एकाचवेळी ८ महिला गरोदर होत्या. एंडरसन हॉस्पिटलच्या ऑब्सटेट्रिशियन विभागात काम करणाऱ्या ८ नर्स गरोदर झाल्या होत्या.