अनेकांना फिरण्याची आवड असते, देश-परदेशात भटकंती करणाऱ्या पर्यटकांची संख्याही अधिक आहे. आता पर्यटन म्हटलं तर खर्चही करावा लागतो. परंतु फिरण्याचा छंद असलेले त्यातूनही खर्चाचा जुगाड काढतात. अलीकडेच एका मुलीने जे काही केले ते ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. सबीना त्रोजानोवा नावाच्या मुलीने अवघ्या ५० डॉलर म्हणजे ५ हजारात रुपयांत ३ देशांचा प्रवास केला आहे. इतकेच नाही तर अन्य पर्यटकांनीही असाच खर्चाचा ताळमेळ बसवावा यासाठी सबीनाने प्रत्येक खर्चाचा हिशोब व्हिडिओत शेअर केला आहे.
कोणत्या देशात फिरली सबीना?२९ वर्षीय सबीना ९ मे रोजी लंडनहून आयरलँडच्या डबलिन येथे १३०० रुपयांत फ्लाइटने गेली. त्यानंतर २ दिवस डबलिनमध्ये राहिल्यानंतर ती फ्रान्समधील मार्सैय शहरात १७०० रुपयांत फ्लाइटने पोहचली. याठिकाणी फिरल्यानंतर सबीनाने स्पेनच्या पामा येथे जायला १६०० रुपयांत फ्लाइटचं तिकीट बूक केले. सबीनाला ३ देशांमध्ये फिरण्यासाठी फ्लाईट, राहण्याचा खर्च, जेवण हे सगळे मिळून एकूण ६३ हजार रुपये खर्च आला. ३ देशांचा प्रवास करून हा खर्च खूपच कमी आहे.
आदल्या रात्री बुक करायची फ्लाइटपूर्व लंडनमधील कंटेट क्रिएटर सबीना म्हणाली की, “मला अनेकांनी सांगितले की त्यांना प्रवास करायचा आहे पण खर्च परवडत नाही. हेच लक्षात घेऊन, मी नवीन देशात सर्वात स्वस्त फ्लाइट शोधण्यासाठी निघाले. मला ते एकटीला करायचे होते. माझे पुढचे ठिकाण शोधण्यासाठी मी आदल्या रात्री फ्लाइट बुक करायचे. मी शहरांमधून पायी फिरले. मला एक स्त्री म्हणून स्वतःहून प्रवास करणे कसे वाटते हे दाखवायचे होते.
स्वस्त विमान कसे शोधायचे?सबीनाने तिच्या पुढील ठिकाणी जाण्यासाठी स्वस्त उड्डाणे शोधत होती. एका APP मधून तिने स्वस्त तिकीट बुक केलेत. शहरांमध्ये तिचा कमी वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्वतःसाठी चार टास्क सेट केल्या होत्या. प्रत्येक देशात मला तेथील पारंपारिक, स्थानिक फुड खायचे होते. स्थानिक इतिहासातील महिलेबद्दल जाणून घ्यायचे होते. मला स्थानिक लेखकाचे पुस्तक वाचायचे होते हे सबीनाने ठरवले होते.