Red Ant Chutney : लाल मुंग्या जर हाता-पायांना चावल्या तर काय होतं हे अनेकांना चांगलंच माहीत असेल. सामान्यपणे लाल मुंग्यांपासून दूर राहतात आणि त्यांना घरात न येऊ देण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. पण अनेकांना हे माहीत नाही की, देशातील काही भागांमध्ये लाल मुंग्यांची चटणी आवडीने खाल्ली जाते. छत्तीसगढ आणि ओडिशामध्ये लोक आवडीने लाल मुंग्यांची चटणी खातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लोक लाल मुंग्या का खातात आणि याचे काय फायदे होतात? तर तेच आज आम्ही सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
ओडिशा आणि छत्तीसगढमध्ये आदिवासी समाजातील लोक लाल मुंग्यांची चटणी खातात. बस्तरमध्ये लाल मुंग्यांच्या चटणीला चापडा चटणी म्हणतात. ही चटणी पळसाच्या किंवा कोणत्याही झाडाच्या मोठ्या पानात खायला दिली जाते.
मुंग्यांच्या चटणीचे फायदे
ही आदिवासी समाजातील लोकांची एक पारंपारिक डिश आहे. महत्वाची बाब या डिशच्या टेस्टला ब्रिटिश शेफ बॉर्डन रामसेच्या फेव्हरेट लिस्टमध्येही स्थान आहे. लाल मुंग्याच्या चटणीमध्ये फॉर्मिक अॅसिड, आयर्न, कॅल्शिअम, झिंक, व्हिटॅमिन बी-12 सारखे पोषक तत्व मिळतात.
इतकंच नाही तर ही चटणी डोळे आणि हृदयासाठीही फायदेशीर मानली जाते. आदिवासी लोक ही चटणी खाऊनच हे पोषक तत्व मिळवतात. तसेच त्यांचा अनेक आजारांपासूनही याने बचाव होतो. असं सांगितलं जातं की, छत्तीसगढच्या आदिवासी भागांमध्ये एकही वयोवृद्ध व्यक्ती चष्मा लावून दिसणार नाही. तसेच ते दिवसभर एनर्जीने काम करताना दिसतात.
छत्तीसगढच्या बस्तर भागातच ही चटणी जास्त बनवली जाण्यालाही खास कारण आहे. कारण म्हणजे येथील जगलांमध्ये या लाल मुंग्या खूप जास्त आढळतात. आंब्याची झाडे असो वा इतर कोणतीही झाडे त्यांवर या मुंग्या आपलं घरटं तयार करतात. या मुंग्या फारच घातक असतात. त्यामुळे दुसऱ्या प्रजातीच्या मुंग्या त्यांच्यापासून दूर राहतात. ही स्थिती ओडिशातील काही भागांमध्ये आहे.
कशी बनवतात ही चटणी?
चटणी बनवण्यासाठी झाडाची फांदी तोडून मुंग्या अंड्यांसहीत जमा केल्या जातात. त्या ठेचून वाळवल्या जातात. नंतर त्यात टोमॅटो, लसूण, आले, मिरची, पदीना आणि मीठ टाकून ही चटणी बनवली जाते.