भारतात हिंदू धर्मातील लोकांना दोन लग्न करण्याची परवानगी नाही. हिंदू मॅरेज अॅक्ट 1955 नुसार भारतात दोन लग्न करण्याची परवानगी नाही. पण अनेकांना हे माहीत नाही की, भारतात असंही एक राज्य आहे जिथे हिंदू धर्मानुसार दोन लग्न करण्याची परवानगी आहे आणि याला कायदेशीर मान्यताही आहे. चला जाणून घेऊ या राज्याबाबत...
आम्ही ज्या राज्याबाबत सांगत आहोत ते राज्य आहे गोवा. जेव्हा गोव्यामध्ये पोर्तुगीजाचं शासन होतं तेव्हा त्यावेळी पोर्तुगीज सिव्हल कोड लागू करण्यात आला होता. ही बाब 1867 मधील आहे. त्यावेळी भारतात ब्रिटिशांकडूनही सिव्हील कोड बनवण्यात आला नव्हता. पोर्तुगीज सरकारने गोव्यासाठी कायदा तयार केला होता. त्यावेळी गोव्यात ख्रिश्चन आणि हिंदू धर्माचे लोक जास्त होते.
त्यावेळी हिंदू लोकांमध्ये एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा रिवाज होता. पण जेव्हा भारतात समान नागरी कायदा लागू झाला तेव्हा सगळेच याच्या अंतर्गत आले. पण गोव्यातील लोकांना सोडून. या कायद्यानुसार हिंदू धर्मातील लोकांना एकच लग्न करण्याची परवानगी मिळाली. पण या कायद्यात काही अटी लागू करत केवळ गोव्यात जन्माला आलेल्या लोकांना एक एक पत्नी असतानाही दुसरं लग्न करण्याची परवानगी दिली गेली. हा कायदा अजूनही तसाच गोव्यात लागू आहे.
जेव्हा गोवा स्वतंत्र झाला तेव्हा नव्या राज्यात तोच सिव्हिल कोड स्वीकारण्यात आला जो पोर्तुगीजांच्या शासन काळात होता. यानुसार हिंदूंना काही अटींनुसार बहुविवाहाची परवानगी मिळते. जसे की, पहिली अट आहे की, 25 वर्ष जर पत्नीकडून एकही अपत्य झालं नाही तर दुसरं लग्न करता येईल. दुसरी अट म्हणजे 30 वयापर्यंतही पत्नी जर अपत्याला जन्म देऊ शकत नसेल तर पती दुसरं लग्न करू शकतो.