मध्य प्रदेशच्या(Madhya Pradesh)च्या छतरपूर जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा हिरा भांडार (Diamond) मिळाल्याचा दावा केला जात आहे. येथील वकस्वाहा जंगलात ३.४२ कोटी कॅरेट हिरे दबले असल्याचा अंदाज आहे. हिऱ्यांचा हा भांडार काढण्यासाठी ३८२.१३१ हेक्टर जंगल तोडलं जाईल.
आतापर्यत देशातील सर्वात मोठा हिऱ्यांचा खजिना मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात आहे. इथे एकूण २२ लाख कॅरेट हिऱ्यांचा भांडार आहे. यातील १३ लाख कॅरेट हिरे काढले गेले आहेत. आता बकस्वाहा जंगलात पन्नापेक्षाही १५ पटीने जास्त हिरे भांडार असल्याचा अंदाज आहे.
बंदर डायमंड प्रोजेक्ट अंतर्गत या ठिकाणाचा सर्व्हे २० वर्षाआधी सुरू झाला होता. दोन वर्षाआधी प्रदेश सरकारने या जंगलाचा लिलाव केला. आदित्य बिरला ग्रुपच्या एस्सेल मायनिंग अॅन्ड इंडस्ट्रीज लिमिटेडने खोदकामाचं टेंडर मिळवलं. मध्य प्रदेश सरकारने बकस्वाहा जंगलात हिऱ्याचा भांडार असलेली ६२.६४ हेक्टर जमीन या कंपनीला ५० वर्षांसाठी भाड्याने दिली.
वन विभागाने या जमिनीवर असलेल्या झाडांची मोजणी केली आहे. इथे २,१५,८७५ झाडे आहेत. ते कापावे लागणार आहेत. आधी ऑस्ट्रेलियाची कंपनी रियोटिंटोने इथे खोदकाम करण्यासाठी अर्ज केला होता. मे २०१७ मध्ये संशोधित प्रस्तावावर पर्यावरण मंत्रालयाने या कंपनीला काम देण्यास नकार दिला.
रियोटिंटो कंपनीचा पीएमबी स्कॅमचा फरार हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंध आहे. आदित्य बिडला ग्रुपने ३८२.१३१ हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. ६२.६४ हेक्टरमध्ये हिऱ्याची खाण असेल, इतर २०५ हेक्टर जमिनीचा वापर खोदकाम आणि प्रोसेसिंगसाठी केला जाईल. कंपनी इथे २५०० कोटी रूपयांची गुंतवणूक कऱणार आहे.
या जंगलाच्या बदल्यात बकस्वाहा तहसीलमध्ये३८२.१३१ हेक्टर राजस्व जमीनला वनभूमीत डायवर्ट करण्याचा प्रस्ताव कंपनीला देण्यात आला आहे. या जमिनीवर जंगल विकसित करण्यासाठी येणारा खर्च एस्सेल मायनिंग अॅन्ड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी करेल.
छतरपूर डीएफओ अनुराग कुमार यांनी सांगितले की, एका कमेटीसमोर याची सुनावणी सुरू आहे. त्यानंतर नवे निर्देश दिले जातील. डिसेंबर २०२० मध्ये दिलेला रिपोर्ट जुन्या डीएफओने दिला आहे.