(Image Credit : depositphotos.com)
लंडन : ब्रिटनमध्ये एक भारतीय विद्यार्थिनी प्रसारमाध्यमात चर्चेत आहे. पण ती यूनिव्हर्सिटीमधील तिच्या चांगल्या रेकॉर्ड किंवा अभ्यासामुळे नाही तर शाही लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एका भारतीय अरबपती व्यक्तीची लाडकी लेक स्कॉटलॅंडच्या सेंट एंडूज यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी आली आहे. मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या पालकांनी तिच्यासाठी शाही महल आणि सोबतच १२ स्टाफची व्यवस्था केली आहे. स्टाफमध्ये खासकरुन बटलर, शेफ, मेड, हाऊसकिपर, माळी आणि शोफर यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ४ वर्षांच्या शिक्षणासाठी पॅलेससोबतच खासप्रकारच्या आपल्या कामात एक्सपर्ट असलेल्या स्टाफच्या निवडीवर लक्ष देण्यात आलं आहे. परिवार फारच शिस्तप्रिय असल्याने केवळ अनुभवी आणि कुशल स्टाफच्या निवडीवर भर दिला आहे. बटलर(नोकर) हा खासकरुन मेन्यूची काळजी घ्यावी लागार आहे आणि शेफ कसे जेवण बनवत आहेत यावर लक्ष ठेवायचे आहे. तर एका व्यक्तीची निवड केवळ जेवण वाढण्यासाठी आणि टेबलची स्वच्छता करण्यासाठी केली आहे.
या श्रीमंत परिवाराने नोकरांसाठी एका जाहिरात दिली आहे. ही जाहिरात फारच गाजत आहे. असे मानले जात आहे की, एखाद्या भारतीय विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी राहण्याच्या सोयीसाठी इतका खर्च करण्यात आल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. यासोबतच पर्सनल स्टाफच्या कामाच्या यादीत गरज असेल तेव्हा दार उघडणे, दुसऱ्या स्टाफसोबट रुटीन शेड्यूल तयार करणे, वॉर्डरोब मॅनेजमेंट आणि पर्सनल शॉपिंग यांचाही समावेश आहे.
मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गरज असताना दार उघडण्यासाठी ठेवण्यात आलेल्या स्टाफचा पगार जवळपास वर्षाला ३० हजार पाऊंड इतका आहे. त्यावरुन इतरांचा पगार किती असेल याची अंदाज लावला जाऊ शकतो. मात्र ही कुणाची मुलगी आहे? कोणत्या परिवारातील आहे याची माहिती मिळू शकली नाही.