दुबईमध्ये राहणाऱ्या एका भारतीय इंजिनिअर शिविन विल्सनचं नशीब चमकलं की, त्याने एका साप्ताहिक लकी ड्रॉमध्ये लाखो रूपये जिंकले. त्याने या लकी ड्रॉमधून २००,००० दिरहम म्हणजे ५४,४५१ अमेरिकन डॉलर(४० लाख रूपये) जिंकले आहेत.
केरळचा इंजिनिअर शिविन विल्सनन १६ जानेवारीला आयोजित लकी ड्रॉ दरम्यान सहा पैकी पाच अंक मिळवले. आश्चर्याची बाब म्हणजे हा लकी ड्रॉ तो स्वत: बघू शकला नाही. जेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी रिझल्ट पाहिला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तो लकी ड्रॉ जिंकला होता. ( हे पण वाचा : वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव)
पीटीआय मीडिया रिपोर्ट्सनुसार विल्सन म्हणाला की, जेव्हा तो पहिल्यांदा खेळायला गेला होता तेव्हा फार उत्साही होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला समजलं की, तो लकी ड्रॉ जिंकला त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. विल्सनने सांगितले की, हा पैसा तो त्याचं करिअर चांगलं करण्यासाठी खर्च करेल. यातून आई-वडिलांना मदत करेल. तो म्हणाला की, पहिल्यांदा तो इतकी मोठी रक्कम जिंकला. त्याचं मत आहे की, काहीही शक्य आहे फक्त तुम्हाला स्वत:वर विश्वास असला पाहिेजे.
त्याने सांगितले की, त्याने जे मित्र नियमितपणे हे खेळतात त्यांनी त्याला या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. विल्सन एक पेट्रोकेमिकल प्लांटमध्ये इंजिनिअर म्हणून काम करतो. दरम्यान गेल्या महिन्यातच केरळच्या ३० वर्षीय नवनीत सजीवनने संयुक्त अरब अमीरातमध्ये एका लकी ड्रॉ स्पर्धेत १ मिलियन अमेरिकन डॉलर जिंकले होते.