कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:53 PM2020-07-30T12:53:46+5:302020-07-30T12:55:09+5:30
अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.
भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आजही देशातील ७५ लोक हे शेती करतात. हे देशातील जास्तीत जास्त लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण अनेक भागात कमी पाऊस होणे आणि जुन्याच पद्धती वापरल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.
हीच स्थिती मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्हा झाबुआमध्ये झाली होती. डोंगराळ आदिवासी क्षेत्रात शेती करणं कठिण होतं. येथील माती आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पिक कमी व्हायचं. अशात रमेश बारिया नावाच्या एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या समस्यांवर मात करत चांगली शेती करण्याची इच्छा ठेवली.
त्यातून त्यांनी २००९-१० मध्ये NAIP (राष्ट्रीय कृषि नवाचार परियोजना) KVK वैज्ञानिकांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनात हिवाळा आणि पावसाळ्यात छोटयाशा जागेत भाज्यांची शेती सुरू केली. ही जमिनही अशा पिकासाठी फायदेशीर होती. इथे त्यांनी कारले, लौकीचं पिक घेणं सुरू केलं. लवकरच त्यांनी एक छोटी नर्सरीही सुरू केली. पण पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाण्याची कमतरता भासत होती.
त्यामुळे त्यांचं आलेलं पिक खराब होत होतं. बारिया यांनी NAIP कडे मदत मागितली. इथे त्यांना सल्ला देण्यात आला की, वेस्ट ग्लूकोज पाण्याच्या बॉटलच्या मदतीने एक सिंचन टेक्निक वापरा. त्यांनी २० रूपये प्रति किलो दराने ग्लूकोज प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आणि पाण्यासाठी एक इनलेट करण्यासाठी वरचा भाग कापला. ही बॉटल त्यांनी नंतर या झाडांजवळ लटकवल्या.या बॉटलपासून त्यांनी एका एका थेंबाचा स्थिर पाण्याचा प्रवाह तयार केला. त्यांनी त्यांच्या मुलांनाही शाळेत जाण्याआधी या बॉटल्समध्ये पाणी भरण्यास सांगितले.
फक्त एवढ्या उपायाने ते सीझन संपल्यानंतर 0.1-हेक्टेयर जमिनीतून 15,200 रुपयांचं उत्पादन घेऊ लागले. या उपायाने ते झाडांना दुष्काळापासून वाचवू शकत तर होतेच सोबतच याने पाण्याची नासाडीही टाळली जात होती. पाण्याचा पुरेपुर आणि योग्य वापर होत होता. तसेच या टेक्निकने कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ग्लूकोजच्या प्लास्टिक बॉटलचा वापर होऊ लागला. ही टेक्निक लवकरच गावातील इतरही शेतकऱ्यांनी अंगीकारली. रमेश बारिया यांना जिल्हा प्रशासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने सन्मानितही केले.
लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग