शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

कचऱ्यातल्या ग्लुकोज बॉटल्सही ठरल्या 'गुणकारी', लाखो रुपये कमावू लागला 'रँचो' शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:53 PM

अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे. आजही देशातील ७५ लोक हे शेती करतात. हे देशातील जास्तीत जास्त लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. पण अनेक भागात कमी पाऊस होणे आणि जुन्याच पद्धती वापरल्याने शेतकऱ्यांना फायदा होत नाही. अनेक शेतकऱ्यांना आवश्यक वस्तूंच्या कमतरतेमुळे नुकसान सहन करावं लागतं. याच कारणाने अनेक शेतकरी आत्महत्या करतात.

हीच स्थिती मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल जिल्हा झाबुआमध्ये झाली होती. डोंगराळ आदिवासी क्षेत्रात शेती करणं कठिण होतं. येथील माती आणि पावसाची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना पिक कमी व्हायचं. अशात रमेश बारिया नावाच्या एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या समस्यांवर मात करत चांगली शेती करण्याची इच्छा ठेवली. 

त्यातून त्यांनी २००९-१० मध्ये NAIP (राष्ट्रीय कृषि नवाचार परियोजना) KVK वैज्ञानिकांसोबत संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनात हिवाळा आणि पावसाळ्यात छोटयाशा जागेत भाज्यांची शेती सुरू केली. ही जमिनही अशा पिकासाठी फायदेशीर होती. इथे त्यांनी कारले, लौकीचं पिक घेणं सुरू केलं. लवकरच त्यांनी एक छोटी नर्सरीही सुरू केली. पण पावसाच्या अनिश्चिततेमुळे पाण्याची कमतरता भासत होती.

त्यामुळे त्यांचं आलेलं पिक खराब होत होतं. बारिया यांनी NAIP कडे मदत मागितली. इथे त्यांना सल्ला देण्यात आला की, वेस्ट ग्लूकोज पाण्याच्या बॉटलच्या मदतीने एक सिंचन टेक्निक वापरा. त्यांनी २० रूपये प्रति किलो दराने ग्लूकोज प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला आणि पाण्यासाठी एक इनलेट करण्यासाठी वरचा भाग कापला. ही बॉटल त्यांनी नंतर या झाडांजवळ लटकवल्या.या बॉटलपासून त्यांनी एका एका थेंबाचा स्थिर पाण्याचा प्रवाह तयार केला. त्यांनी त्यांच्या मुलांनाही शाळेत जाण्याआधी या बॉटल्समध्ये पाणी भरण्यास सांगितले. 

फक्त एवढ्या उपायाने ते सीझन संपल्यानंतर 0.1-हेक्टेयर जमिनीतून 15,200 रुपयांचं उत्पादन  घेऊ लागले. या उपायाने ते झाडांना दुष्काळापासून वाचवू शकत तर होतेच सोबतच याने पाण्याची नासाडीही टाळली जात होती. पाण्याचा पुरेपुर आणि योग्य वापर होत होता. तसेच या टेक्निकने कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या ग्लूकोजच्या प्लास्टिक बॉटलचा वापर होऊ लागला. ही टेक्निक लवकरच गावातील इतरही शेतकऱ्यांनी अंगीकारली. रमेश बारिया यांना जिल्हा प्रशासनाने आणि मध्य प्रदेश सरकारने सन्मानितही केले.

क्या बात! 150 वर्षे जुन्या झाडाची एक फांदीही न तोडता बांधलं अनोखं घर, दूरदूरून बघायला येतात इंजिनिअर!

लय भारी! शेतकऱ्यानं केली कमाल; घराच्या छतावर फुलवली ४० प्रकारच्या आंब्याची बाग

टॅग्स :FarmerशेतकरीInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सMadhya Pradeshमध्य प्रदेश