देशातील बरेच लोक ट्रेनने नेहमीच प्रवास करतात. भारतात ट्रेनला देशाची लाइफलाईन म्हटलं जातं. ट्रेनन लाखो लोक रोज एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. ट्रेनने प्रवास करण्याआधी जिथे जायचंय त्या ठिकाणचं तिकीट काढावं लागतं. पण भारतात काही स्टेशन असेही आहेत ज्यांना नावच नाहीत. या निनावी स्टेशनवर रोज ट्रेन थांबतात, लोक त्यात बसतात आणि पुढे जातात. भारतात असे दोन रेल्वे स्टेशन आहेत ज्यांना नाव नाही. चला जाणून घेऊ या स्टेशनांबाबत आणि त्यांच्या खास गोष्टींबाबत....
भारतात २ रेल्वे स्टेशन अशी आहेत ज्यांना नाव नाही. एक पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यातील बांकुरा-मेसग्राम रेल्वे मार्गाववर आहे. तर दुसरं झारखंडच्या रांची-टोरी मार्गावर आहे. या दोन्ही स्टेशन्सना अजूनही नाव का दिले नाहीत. यामागचणी कहाणीही रोमांचक आहे.
पश्चिम बंगालच्या बांकुरा-मेसग्राम रेल्वे लाइवर असलेल्या नाव नसलेलं स्टेशन २००८ मध्ये तयार करण्यात आलं होतं. स्टेशन तयार केल्यावर त्याचं नाव रैनागढ ठेवण्यात आलं. पण या नावाला गावातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता आणि त्यांनी याबाबत तक्रार केली. तेव्हापासून या स्टेशनचा वाद सुरूच आहे. हे एक मोठं कारण आहे की, आतापर्यंत या स्टेशनला कोणतंही नाव मिळालं नाही. (हे पण वाचा : यमनमधील लाखो वर्ष जुन्या या खड्ड्यात पहिल्यांदाच उतरले वैज्ञानिक, जे सापडलं ते पाहून हैराण झाले)
तेच दुसरीकडे झारखंडच्या रांचीहून जेव्हा टोरी लाइनवर येता तेव्हा मधे एक असं स्टेशन येतं, ज्याला नाव नाही. या स्टेशनला नाव नसण्यामागेही एक रोमांचक किस्सा आहे. २०११ मध्ये जेव्हा या रेल्वे स्टेशनवर रेल्वेला सुरूवात करण्यात आली तेव्हा याचं नाव बडकी चांपी ठेवण्यात आलं होतं.
या नावालाही स्थानिक लोकांनी विरोध दर्शवला. ते म्हणाले की, त्यांनी हे स्टेशन उभं करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे स्टेशनला कमले असं नाव असायला हवं. तेव्हापासून या स्टेशनला नावच नाही. रिपोर्टनुसार रेल्वे स्टेशनचे अधिकार रजिस्टरवर या स्टेशनचं नाव बडकी चांपी असंच लिहितात.