What are railway rules : भारतात जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करतात. अनेकजण लांब प्रवास करतात त्यामुळे लोक सकाळी स्टेशनवर पोहोचल्यावर प्लॅटफॉर्मच्या नळांवर ब्रश करताना बघायला मिळतात.
इतकंच नाही तर जेवणाची भांडीही लोक इथेच धुतात. पण अनेकांना हे माहीत नसेल की, रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या नळांवर किंवा इतर ठिकाणी म्हणजे शौचालय सोडून ब्रश करणं, खरकटी भांडी घासणं एक गुन्हा आहे. यासाठी रेल्वेकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ या नियमांबाबत...
रेल्वे अधिनियम 1989 नुसार, रेल्वे परिसरात ठरलेल्या ठिकाणांऐवजी इतर स्थानांवर ब्रश करणं, थुंकणे, टॉयलेट करणं, भांडी घासणं, कपडे किंवा इतर काही वस्तू धुणं गुन्हा ठरतो. ही कामे शौचालय, वॉशरूममध्ये केली जाऊ शकतात. जर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तुम्हाला हे करताना पकडलं तर तुम्हाला 500 रूपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
तसेच रेल्वे स्टेशनच्या परिसरात तुम्ही काही पोस्टर चिटकवता किंवा काही लिहिता तेव्हा तुम्हाला रेल्वे अधिनियमानुसार हाही गुन्हा ठरतो. यावरही दंड भरावा लागू शकतो.
जास्तीत जास्त प्रवासी चिप्स किंवा इतर खाण्याच्या पदार्थांचे पॅकेट्स स्टेशन परिसराच्या रिकाम्या जागी किंवा रेल्वे रूळावर फेकतात. हाही एक गुन्हा आहे. ठरलेल्या ठिकाणांशिवाय इतर ठिकाणी या गोष्टी फेकल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.