भारतीय रेल्वे जगातील चौथ्या आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. यावर रोजच्या रोज हजारो गाड्या धावतात. जर आपण कधी रेल्वे पटरी बघितली असेल, तर दोन पटऱ्यांमध्ये आपल्याला काहीसा गॅप सोडल्याचे दिसून येईल. दोन पटऱ्यांमधील हा गॅप पाहून, यामुळे एखादवेळी अपघात तर होणार नाही ना, असाच विचार आपल्या मनात येत असेल. मात्र, दोन रेल्वे पटऱ्यांमध्ये गॅप सोडण्यामागे मोठे कारण आहे. खरे तर, या गॅपमुळे अनेक मोठे अपघात टळतात. तर यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ यात.
असं आहे वैज्ञानिक कारण -खरे तर पटऱ्यांमध्ये असा गॅप सोडण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. जर आपम विज्ञान विषयाचे विद्यार्थी असाल तर आपल्याला माहीत असेल, की कुठलाही धातू गरम झाल्यानंतर प्रसरण पावतो आणि थंड झाल्यानंतर अकुंचन पावतो. ट्रेनच्या पटऱ्या लोकंडापासून बनलेल्या असतात. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत जेव्हा पट्रीचा भार या पटऱ्यांवर पडतो तेव्हा त्या प्रसरण पावतात. यामुळेच दोन पटऱ्यांमध्ये थोडा गॅप ठेवलेला असतो.
अपघात टाळण्यासाठी ठेवला जातो गॅप -जर दोन पटऱ्यांमध्ये गॅप ठेवला गेला नाही, तर पटऱ्या पसरतील आणि त्यांच्यावरील दबाव वाढेल. यामुळे त्या तुटून मोठा रेल्वे अपघातही होऊ शकतो. यामुळे पटऱ्यांमध्ये सोडण्यात आलेल्या गॅपमुळे अपघात होऊ शकतो, असे आपल्याला वाटत असेल तर हे चुकीचे आहे. खरे तर अपघात टाळण्यासाठी हा गॅप सोडला जातो. ट्रॅकमधील हे अंतर आता कमी केले जात असले तरी, ते कधीही पूर्णपणे भरून काढले जाणार नाही.