शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

'हे' आहे देशातील सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानक, स्पेलिंग वाचून तुमचे डोके चक्रावून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 7:31 PM

Indian Railways facts : भारतीय रेल्वेचे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक हावडा जंक्शन आहे, ज्यात जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म आहेत.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railways) जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. भारतीय रेल्वे जगातील 8 व्या क्रमांकाचे सर्वात मोठे नियोक्ता म्हणून देखील ओळखले जाते. देशातील पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली, हे तुम्हाला माहीत आहे का? भारतीय रेल्वेशी संबंधित अशा अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत.

सर्वात मोठे नाव असलेले रेल्वे स्थानकवेंकटनरसिंहराजूवरीपेटा (Venkatanarasimharajuvaripeta) हे इतके मोठे नाव आहे की वाचताना जीभही उत्तर देऊ शकते. भारतातील सर्व रेल्वे स्थानकांची नावे वेंकटनरसिंहराजूवरीपेटा रेल्वे स्थानकापेक्षा लहान आहेत. हे रेल्वे स्थानक नावाने प्रसिद्ध आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे यात 28 अक्षरे आहेत. यावरून रेल्वे स्थानकाचे नाव किती मोठे आहे, याचा अंदाज बांधता येतो. हे नाव उच्चारायला सोपे जावे, म्हणून लोक त्याला वेंकटनरसिंह राजुवरीपेट या नावानेही संबोधतात. वेंकटनरसिंहराजूवरीपेटा हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तामिळनाडूच्या सीमेवर स्थित आहे.

सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानकआता तुम्ही देशातील सर्वात मोठे नाव असलेल्या रेल्वे स्थानकाच्या माहितीबद्दल जाणून घेतले. पण आता तुम्ही देशातील सर्वात लहान नाव असलेल्या रेल्वे स्थानकाबद्दल जाणून घ्या... सर्वात लहान नाव असलेले रेल्वे स्थानक इब (IB) आहे. ओडिशातील झारसुगुडा येथे असलेले इब रेल्वे स्थानक फक्त दोन अक्षरांपुरते मर्यादित आहे. दरम्यान, इब हावडा-नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर आहे. या स्थानकावर फक्त 2 फलाट आहेत. यामुळेच या स्थानकावरून फारशा गाड्या जात नाहीत, गाड्यांचा थांबाही केवळ दोन मिनिटांचा आहे.

भारतीय रेल्वेशी संबंधित इतर माहिती...- आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील बोगीबील पूल हा भारतातील सर्वात लांब रेल्वे-रोड पूल आहे.- पीर पंजाल रेल बोगदा, जम्मू आणि काश्मीरच्या मध्यभागी हिमालयाच्या पीर पंजाल प्रदेशात स्थित आहे, हा भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे.- भारतीय रेल्वेकडे युनेस्को-मान्यताप्राप्त चार जागतिक वारसा स्थळे आहेत.- 7 रेल्वे मार्ग मथुरा जंक्शनपासून उगम पावतात, जे जास्तीत जास्त रेल्वे मार्ग असलेले जंक्शन आहे.- भारतीय रेल्वेचे सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक हावडा जंक्शन आहे, ज्यात जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म आहेत.- गोरखपूरमध्ये जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहे, ज्याची लांबी 4,483 फूट आहे.- हावडा-अमृतसर एक्स्प्रेसला सर्वाधिक थांबे (115 थांबे) आहेत.- लॉर्ड डलहौसी यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हटले जाते.- जॉन मथाई हे भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते.- भारतीय रेल्वे रॉयल राजस्थान ऑन व्हील्स, पॅलेस ऑन व्हील्स, द गोल्डन रथ, महाराजा एक्सप्रेस आणि द डेक्कन ओडिसी या 5 रॉयल ट्रेन्स देखील चालवते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके