Fans in Indian Railways: भारतात दररोज लाखो-करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे ही देशाची जीवनवाहिनी मानली जाते. कदाचित तुम्ही ऐकले असेल की पूर्वी ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी होत असे. चोरटे रेल्वेतून पंखे, बल्ब आदी वस्तू चोरून नेत. पण आता असे केल्यास तुम्हाला दीर्घकाळ तुरुंगात जावे लागू शकते. पूर्वीच्या काळी ट्रेनमधून पंखे चोरीला जाणे सामान्य होते. यानंतर भारतीय रेल्वेने यावर उपाय शोधला आणि त्याचा परिणाम म्हणजे, त्यानंतर चोरांना इच्छा असूनही ट्रेनमधील पंखा चोरता येऊ शकला नाही. कारण रेल्वेमध्ये असलेला पंखा फक्त रेल्वेतच चालतो, घरात तो पंखा चालूच शकत नाही. नक्की रेल्वेने अशी कोणती उपाययोजना केली, की हे असे घडते.. जाणून घेऊया.
बनवला घरात वापरता येणार नाही असा पंखा
चोरीच्या वाढत्या घटना पाहता भारतीय रेल्वेने नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. अभियंत्यांनी पंखे अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते सामान्य घरांमध्ये चालू शकत नाहीत. तुम्ही त्यांचा वापर फक्त ट्रेनमध्येच करू शकता आणि तुम्ही पॅसेंजर ट्रेनच्या बोगीमध्ये हवा खाऊ शकता. हे पंखे बाहेर कुठेही वापरायचे असतील तर ते शक्य होत नाही. आता तुम्ही विचार करत असाल की हे कसे शक्य आहे. या मागचे कारण नक्की काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
रेल्वेतील पंखे म्हणजे केवळ भंगाराचं सामना असल्याचे काही लोक म्हणताना दिसतात. पण खरी गोष्ट म्हणजे हे पंखे अतिशय कल्पनतेने डिझाईन करण्यात आले आहेत. आपण आपल्या घरात दोन प्रकारची वीज वापरतो. AC (अल्टरनेटिव्ह करंट) आणि DC (डायरेक्ट करंट). घरामध्ये AC वीज वापरली जात असेल तर कमीत कमी करंट २२० व्होल्ट असतो. दुसरीकडे, जर DC वीज प्रवाहाचा वापर केला, तर वीज ५, १२ किंवा २४ व्होल्ट असते. रेल्वेमध्ये बसवलेले पंखे ११० व्होल्टचे बनलेले असतात, जे फक्त DC वर चालतात. घरांमध्ये वापरलेली DC पॉवर ५, १२ किंवा २४ व्होल्टपेक्षा जास्त नसते, त्यामुळे तुम्ही हे पंखे तुमच्या घरात वापरू शकत नाही.