Indian Railway: देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला भाडे द्यावे लागत नाही. ही विशेष ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. तुम्हाला भाक्रा नागल डॅम पाहायला जायचे असेल तर तुम्ही या ट्रेनमधून मोफत प्रवासाचा आनंदही घेऊ शकता.
ट्रेनचे भाडे आकारले जात नाहीवास्तविक ही ट्रेन नांगल ते भाक्रा डॅम दरम्यान धावते. गेल्या 73 वर्षांपासून या ट्रेनमधून एकूण 25 गावांतील लोक मोफत प्रवास करत आहेत. भाक्रा धरणाची माहिती लोकांना देण्यासाठी ही विशेष ट्रेन चालवली जाते. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या हे लोकांना सांगणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवली जाते.
73 वर्षांपासून मोफत प्रवास ही ट्रेन 1949 मध्ये धावली होती आणि गेली 73 वर्षे लोक यामधून मोफत प्रवास करत आहेत. या ट्रेनमधून दररोज 25 गावातील 300 लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो. नांगल ते भाक्रा धरणापर्यंत ही ट्रेन धावते आणि दिवसातून दोनदा प्रवास करते. या ट्रेनमध्ये टीटीई नसतो. डिझेल इंजिनवर चालणारी ही ट्रेन एका दिवसात 50 लिटर डिझेल वापरते. या गाडीचे इंजिन सुरू झाले की, भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते.
ही ट्रेन किती वाजता सुटते?ही हास ट्रेन नांगलहून सकाळी 7:05 वाजता निघते आणि भाक्राहून सकाळी 8:20 वाजता नांगलला परत येते. यानंतर पुन्हा एकदा दुपारी 3.05 वाजता ती नांगल येथून निघते आणि सायंकाळी 4.20 वाजता भाक्रा धरणाकडे परत येते.