देशभरातील लाखो लोक रोजच्या रोज भारतीय रेल्वेने प्रवास करत असता आणि रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेत असतात. यासाठी वेगवेगळ्या श्रेणीतील लोक आवश्यकतेनुसार आपले तिकीट बुक करत असतात. रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते स्लीपर आणि एसी डब्यांपर्यंतची सुविधा देण्यात येते. हे डबेही फूल होताना दिसतात. अनेक रेल्वे गाड्यांमध्ये उच्च श्रेणीचे डबेही देण्यात आलेले आहेत. भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे आणि भारतीय रेल्वेने रोजच्या रोज लाखो लोक प्रवास करत असतात. पण, एक ट्रेन तयार करण्यासाठी किती खर्च येतो? यासंदर्भात आपण कधी वीचार केला आहे?
एक ट्रेन तयार करायला किती खर्च येतो? -ट्रेनमध्ये आपल्याला वाज, पाणी, वॉशरूम, फॅन आणि एसी सारख्या अनेक सुविधा मिळतात. पण ट्रेनचे इंजिन आणि कोच तयार करण्यासाठी किती खर्च येतो? याचा अंदाज आपल्याला नसेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय रेल्वेचे एक इंजिन तयार करण्यासाठी 15 ते 20 कोटी रुपये एवढा खर्च येतो.
या रेल्वेंची निर्मिती भारतातच केली जाते. यामुळे अधिक खर्च येत नाही. भारतीय रेल्वेचे इंजिन दोन प्रकारचे असते. एक म्हणजे, इलेक्ट्रिक इंजिन तर दुसरे डिझेल इंजिन. माध्यमांतील माहितीनुसार, सध्या भारतात सुमारे 52 टक्के रेल्वेगाड्या या डिझेलवर चालतात.
एका इंजिनची किंमत जवळपास 20 कोटी रुपये -डुअल मोड असलेल्या लोकोमोटिव्ह (Dual Mode Locomotive) ट्रेनची किंमत जवळपास 18 कोटी रुपये एवढी आहे. तर 4500 एचपी डिझेल लोकोमोटिव्हची किंमत जवळपास 13 कोटी रुपये सांगण्यात आली आहे. तसेच, एक सर्वसामान्य पॅसेन्जर ट्रेन तयार करण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये एवढा खर्च येतो. कारण या ट्रेनमध्ये एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत सुविधा कमी असतात.
एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण 24 कोच असतात आणि प्रत्येक कोचसाठी सुमारे 2 कोटी रुपये एढा खर्च येतो. कोचची एकूण किंमत जवळपास 50 कोटी रुपये आणि इंजिनची किंमत जवळपास 20 कोटी रुपये. अशा पद्धतीने एक एक्सप्रेस ट्रेन तयार करायला जवळपास 70 कोटी रुपये एवढा खर्च येतो. महत्वाचे म्हणजे, कोचमधील सुविधेनुसार, ही किंमत कमी अधिकही अथवा वेग-वेगळी असू शकते. जनरल आणि स्लीपरच्या तुलनेत एसी कोच महागडे असतात.