महाभारतातील द्रौपदीबाबत तर तुम्ही वाचलं असेलच. द्रौपदीने पांच पांडवांसोबत एकत्र लग्न केलं होतं. तिचं पूर्ण जीवन तिच्या पाचही पतींसोबत गेलं. पण आजकाल केवळ काही पुरूषांबाब ऐकायला मिळतं, जे एकापेक्षा जास्त लग्न करतात. भारतात हिंदू धर्मात तर एकापेक्षा जास्त लग्नाला बेकायदेशीर मानलं जातं. पण भारताच्या हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये अशा काही जमाती आहेत, जिथे महिलांना एकापेक्षा जास्त पती असतात.
परदेशातही लग्नाबाबत अशा केसेस फार बघायला मिळत नाहीत. अशात परदेशी मीडियाला जेव्हा भारतात चालणाऱ्या या रिवाजाबाबत समजलं तेव्हा त्यांनी याची आणखी खोलात जाऊन माहिती घेतली. मेल ऑनलाइनच्या एका वृत्तानुसार, या प्रथेनुसार, एक महिला पाच ते सात पुरूषांसोबत लग्न करू शकतात. पण यात एक अट असते. सगळे पुरूष एकाच परिवारातील असावेत. म्हणजे एकाच परिवारातील सगळ्या भावांसोबत महिला लग्न करू शकते आणि त्यांची पत्नी बनून राहू शकते.
एकाच घरातील अनेक भावांसोबत लग्न होत असल्याने महिलेच्या मुलांचे वडील नेमके कोण याबाबत कन्फ्यूजन असतं. पण पती या गोष्टीची अजिबात चिंता करत नाहीत. त्यावरून काही वादही होत नाहीत. ते सगळ्या मुलांना आपलं समजून त्यांच्यावर प्रेम करतात आणि त्यांचा सांभाळ करतात.
आता त्यांच्या घटस्फोटासाठी काय पद्धत आहे असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर महिलेला घटस्फोट घ्यायचा असेल तर त्यासाठी दोन्हीकडील लोकांची बैठक घेतली जाते. समोर लाकूड ठेवलं जातं आणि ते तोडलं तर त्यांचा घटस्फोट झाला असं मानलं जातं.
कसं चालतं वैवाहिक जीवन?
लग्नानंतरचं वैवाहिक जीवन इथे एका टोपीवर निर्भर करतं. समजा लग्नानंतर कोणताही एक भाऊ पत्नीसोबत एकांतात असेल त्यावेळी खोलीबाहेर दरवाज्यावर एक टोपी ठेवतो. हे सगळे भाऊ मान मर्यादेचं इतकं भान ठेवतात की, दरवाज्यावर टोपी दिसली की जर कुणीही खोलीच्या आत जात नाहीत.
घराची प्रमुख असते महिला
येथील एक खास बाब म्हणजे इथे पुरुष नाहीतर महिला घरातील प्रमुख असतात. त्यांच्याकडे पती आणि मुलांची योग्यप्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी असते. पत्नीला इथे गोयने असं म्हटलं जातं तर पतीला गोर्तेस म्हणतात.