हैराण करून सोडणाऱ्या उकाड्यात जर थंड काही मिळालं तर त्यापेक्षा दुसरा कोणता आनंद नसेल. त्याचप्रमाणे गोठवणाऱ्या थंडीमध्ये जर तुम्हाला 'आइस कॅफे'मध्ये गरमागरम चहा मिळाला तर? आणि तो सुद्धा १४ हजार फूट उंचीवर. हे एखाद्या अॅडव्हेंचरसारखंच असेल. असं काही करण्याची इच्छा असेल तयार व्हा. कारण भारतात अशा एका आइस कॅफेची सुरूवात झाली आहे. लेह-लडाखच्या एका गावात समुद्र सपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर भारतातील पहिला 'नॅच्युरल आइस कॅफे' उघडला आहे.
कुठे आहे हा कॅफे?
रिपोर्टनुसार, हा कॅफे मनाली-लेह हायवेवर आहे. हा कॅफे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केला आहे. हा कॅफे स्थानिक लोकांच्या मदतीने हिवाळ्यात ' बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन'ने तयार केला आहे. हा कॅफे लवकरच सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.
हिवाळ्यात पाणी वाचवण्यासाठी हा कॅफे गढीच्या आकाराचा तयार करण्यात आला आहे. हा कॅफे प्रसिद्ध इंजिनिअर सोनम वांगचुकने 'स्टूपा प्रोजेक्ट' संकल्पनेतून तयार केला आहे. हा प्रोजेक्ट बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत.