जेव्हापासून मानवी संस्कृती विकसित झाली आहे तेव्हापासून लोकांनी स्वत:ला सीमांमध्ये विभागून घेतलं आहे. अशात लोकांना एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा इत्यादी गोष्टींची गरज लागते. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एका गावाचा किस्सा जेथील लोकांकडे दोन देशांची नागरिकता आहे.
आम्ही तुम्हाला सांगतोय लोंगवा गावाबाबत. हे गाव आपल्या भौगोलिक स्थितीमुळे नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे. कारण या गावाचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग म्यानमारमध्ये. हे गाव नागालॅंडच्या मोन जिल्ह्यातील घनदाट जंगलात म्यानमारच्या सीमेवर आहे. या गावात प्रामुख्याने कोंयाक आदिवासी राहतात.
गावाच्या प्रमुखाला ६० पत्नी
लोंगवा गावातली प्रमुखाला अंघ असं म्हटलं जातं आणि अंघ अनेक गावांचा प्रमुख असतो. त्याला एकापेक्षा जास्त महिलांसोबत लग्न करण्याची परवानगी असते. लोंगवा गावाच्या प्रमुखाला ६० पत्नी आहेत आणि ७० पेक्षा गावावर तो शासन करतो. लाोंगवा गावातील प्रमुखाच्या घराच्या मधोमध भारत आणि म्यानमारची सीमारेषा आहे.
(Image Credit : dailymoss.com)
इतकेच नाही तर गावातील अनेक घरांची स्थिती अशीच आहे की, त्यांच्या घरातील किचन भारतात तर बेडरूम म्यानमारमध्ये आहे. इतकंच नाही तर या गावातील अनेक तरूण म्यानमारमध्ये सेनेत आहेत. अनेकजण तिकडे नोकरी करतात.
लोंगवा गावात राहणारे कोंयाक आदिवासी फारच खतरनाक मानले जातात. असे म्हटले जाते की, गावातील सत्ता आणि गावावर ताबा मिळवण्यासाठी लोक नेहमीच शेजारी गावावर कब्जा करत होते. १९४० आधीपर्यंत हे लोक आपल्या गावावर कब्जा मिळवण्यासाठी विरोधकांचे शिर कापत होते. नंतर ते सजवून ठेवत होते. त्यामुळेच या आदिवासी लोकांना हेड हंटर्स असंही म्हटलं जातं.
असे सांगितले जाते की, या गावाला दोन भागात कसं विभागायचं यावर तोडगा निघाला नाही म्हणून अधिकाऱ्यांनी ठरवलं की, सीमारेषा गावाच्या मधोमध तयार केली जाईल. पण कोंयाकवर याचा काहीही प्रभाव पडणार नाही. बॉर्डरवर असलेल्या एका पिलरवर एकीकडे म्यानमारमधील बर्मीज भाषेत संदेश लिहिला आहे तर दुसरीकडे हिंदी भाषेत संदेश लिहिला आहे.