शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

Indonesia: मुस्लिम बहुल इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचा फोटो; यामागे आहे 'हे' मोठे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 7:25 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. भारतीय चलनावर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या फोटोसोबत भगवान लक्ष्मी-गणेश यांचाही फोटो असायला हवा, असे केजरीवाल म्हणाले.

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केलेले एक विधान खूप चर्चेत आहे. भारतीय चलनावर राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या फोटोसोबत भगवान लक्ष्मी-गणेश यांचाही फोटो असायला हवा, असे केजरीवाल म्हणाले. आपले म्हणणे ठेवत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्वात मोठा मुस्लिम बहुल देश इंडोनेशियाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे. येथे 85% मुस्लिम आणि फक्त 2% हिंदू आहेत, पण तिथल्या चलनावर श्री गणेशाचे चित्र आहे. मी पंतप्रधानांना आवाहन करतो की, नव्याने छापलेल्या नोटांवरही माता लक्ष्मी आणि श्री गणेशजींची चित्रे लावावीत. इंडोनेशियाच्या चलनावर भगवान गणेशाचा फोटो का आहे, हे जाणून घेऊया.

मुस्लिम देश असूनही चलनावर गणेशजींचे चित्र का?

भारताच्या चलनाला रुपया म्हणतात, तर इंडोनेशियाचे चलन रुपिया आहे. येथे 20 हजाराच्या नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला आहे. इंडोनेशियामध्ये 20 हजारांच्या नोटेवर गणपतीचे चित्र असून नोटेच्या मागील बाजूस वर्गाचे चित्र छापण्यात आले आहे, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. नोटेवर ज्या शिक्षकाचे चित्र गणेशजींसोबत आहे ते इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांतर आहेत.

इंडोनेशियात सहा धर्मभगवान गणेशाच्या चित्राबाबत असे म्हटले जाते की, इंडोनेशियातील काही भाग एकेकाळी चोल राजवटीत होता. तेव्हा तिथे अनेक मंदिरे बांधली गेली होती. ज्ञान, कला आणि विज्ञानाची देवता म्हणून भगवान गणेशाचा फोटो नोटांवर छापण्यात आला असावा. इंडोनेशियन सरकार अधिकृतपणे सहा धर्मांना मान्यता देते: इस्लाम, प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक, हिंदू धर्म, बौद्ध आणि कन्फ्यूशियन धर्म. या देशातील केवळ 1.7 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. तरीसुद्धा, देशाला हिंदू धर्माचा सुंदर इतिहास आहे.

लोक श्रीकृष्ण आणि हनुमानजींनाही मानतात

असे म्हटले जाते की काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट झाली होती आणि तिथल्या राष्ट्रीय आर्थिक विचारवंतांनी खूप विचार करून 20 हजारांची नवी नोट जारी केली आणि त्यावर श्रीगणेशाचे चित्र छापण्यात आले. तेव्हापासून अर्थव्यवस्था मजबूत झाली असा लोकांचा विश्वास आहे. येथील सैन्याचे शुभंकर हनुमानजी आहेत. इंडोनेशियातील एका प्रसिद्ध पर्यटन स्थळावर अर्जुन आणि श्री कृष्णाचा पुतळाही बसवला आहे, तसेच घटोत्कचाचा पुतळाही बसवला आहे. 

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाGanesh Mahotsavगणेशोत्सवArvind Kejriwalअरविंद केजरीवाल