अलिकडे लहान मुलांची वेगवेगळी क्रिएटिव्ह नावे ठेवण्याचा ट्रेन्ड फारच जोरात आहे. आता हेच बघा ना...इंडोनेशियातील एका आई-वडिलांनी त्यांच्या मुलाचे नाव गुगल ठेवले आहे. बरं याचं कारणही फारच वेगळं आहे. त्यांना वाटतं की, त्यांचा मुलगा मोठा होऊन मोठा राजकारणी होणार आहे. नामकरण केल्यावर अनेकांनी या नावावरून खिल्ली उडवली गेल्याने पालक मुलाल या नावाने हाक मारण्यास घाबरत होते, पण नंतर काही लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने त्यांना या नावावर गर्व वाटला.
वडिलांना नाव वेगळं हवं होतं
८ महिन्यांपूर्वी या मुलाचा जन्म झाला होता. वडील एंडीला मुलाचं नाव वेगळं ठेवायचं होतं. त्यांनी अनेक नावांचा विचार केला. कुराणची देखील मदत घेतली. पण त्यांना कोणतही नाव आवडलं नाही. नंतर त्यांनी टेक्नॉलॉजीसंबंधित काही नावांचा विचार केला.
त्यात विंडो, आयओएस, आयफोन आणि मायक्रोसॉफ्ट याचा समावेश होता. पण शेवटी त्यांनी मुलाचे गुगल हे नाव ठेवले. त्यांचं मत आहे की, हे नाव सध्याच्या वेळेला सर्वात लोकप्रिय नाव आहे आणि सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिनही आहे.
(Image Credit : mirror.co.uk)
आडनाव नाही जोडलं
जेव्हा एंडीला विचारलं गेलं की, त्याने मुलाच्या नावासमोर आडनाव का जोडलं नाही? यावर त्याने सांगितले की, गुगलसोबत दुसरा कोणताही शब्द जोडून त्यांना त्याला कमजोर करायचं नाहीय. मला वाटतं गुगलप्रमाणेच माझा मुलगा सर्वांच्या कामी येईल आणि त्यांच्या कामी येईल. मला लोक गुगलचे पिता म्हणून ओळखतील.
(Image Credit : mirror.co.uk)
लोकांनी उडवली खिल्ली
गुगलची आई एलानुसार, मुलाचं हे नाव ठेवल्यावर लोकांना खूप खिल्ली उडवली होती. लोक म्हणायचे की, दुसऱ्या मुलाचं नाव तुम्ही हॉट्सअॅप ठेवलं पाहिजे. एला म्हणाली की, लोक शब्दांचा अर्थ समजून न घेता त्याची खिल्ली उडवू लागतात. पण एलाने लोकांच्या बोलण्याचा त्रास करून घेतला नाही आणि निर्णयावर कायम राहिली.