बॉडी बनवण्याच्या नादात घेतलं तीन लाखांचं इंजेक्शन, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालं इन्फेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:11 PM2022-03-16T14:11:29+5:302022-03-16T14:13:05+5:30

Indore Crime News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंदी असलेललं इंजेक्शन लावल्यानंतर तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये संक्रमण झालं. आता तरूणाने जिम ट्रेनर विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Indore gym trainer give injection to increase stamina youth gets infection in private part | बॉडी बनवण्याच्या नादात घेतलं तीन लाखांचं इंजेक्शन, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालं इन्फेक्शन

बॉडी बनवण्याच्या नादात घेतलं तीन लाखांचं इंजेक्शन, तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये झालं इन्फेक्शन

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमधून (Indore) एक फारच धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाला जिम ट्रेनरने चांगली बॉडी (Body Builder) बनवण्यासाठी बंदी असलेलं इंजेक्शन लावलं. यानंतर बॉडी राहिली बाजूला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part Infection) समस्या निर्माण झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंदी असलेलं इंजेक्शन लावल्यानंतर तरूणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये संक्रमण झालं. आता तरूणाने जिम ट्रेनर विरोधात तक्रार दाखल केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, इंदुरच्या चंपाबाग सियागंज गावात राहणारा तरूण एजाज मजीदने पोलिसात हैराण करणाराी तक्रार दाखल केली. एजाजनुसार, तो अनूप नगरमधील वन लाइफ फिटनेस जिममध्ये एक्सरसाइज करायला जात होता. तिथे जिम ट्रेनर सफीक उर्फ सोनू खान आणि रईश खानने एजाजला वजन वाढण्यासाठी आणि चांगली बॉडी बनण्याचं खोटं स्वप्न दाखवलं होतं.

एजाजने सांगितलं की, चांगली बॉडी बनवण्याचं आमिष दाखवून जिम ट्रेनरने अडीच ते लाख रूपये घेतले आणि इंजेक्शन दिलं. एजाजने सांगितलं की हे स्टेरॉइडचे इंजेक्शन होते. हे इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन झालं आणि त्याला खूप त्रास होऊ लागला होता. त्याने सांगितलं की, रविवारीही सोनू खानने त्याला एक इंजेक्शन दिलं. जेव्हा तो औषधाची बॉटल बॅगेत ठेवत होता तेव्हा औषधाची चिट्ठी खाली पडली. ते वाचल्यावर एजाजला समजलं की, त्याला बंदी असलेल्या स्टेरॉइडची इंजेक्शन देण्यात आले होते.

स्टॅमिना वाढवण्याच्या नावावर दिले इंजेक्शन

एजाजने सांगितलं की, हे इंजेक्शन त्याचं वजन आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी लावण्यात आले होते. एजाजनुसार, यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळ होऊ लागली होती आणि काही तासांनी लघवी करताना वेदना होत होत्या. यानंतर एजाजने पोलिसांना संपर्क केला. जिम ट्रेनर विरोधात त्याने तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी सोनू खान आणि रईस खान विरोधात तक्रार दाखल करून चौकशी सुरू केली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी एजाजला २०१९ पासून इंजेक्शन देत होता. त्याला आठवड्यातून दोन ते तीन वेळा इंजेक्शन दिलं जात होतं. सध्या पोलीस सोनू खानला अटक केली आहे. त्याच्याकडील इंजेक्शन ताब्यात घेतले. तर त्याचा भाऊ रईस खान फरार आहे.
 

Web Title: Indore gym trainer give injection to increase stamina youth gets infection in private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.