Looteri Dulhan : भारतीय समाज आणि संस्कृतीमध्ये लग्नाला सगळ्यात मोठ्या संस्काराचा दर्जा मिळाला आहे. पती आणि पत्नीच्या नात्याला फार पवित्र मानलं जातं. भारतीय परंपरेनुसार, लग्नाचे सात वचन असतात. ज्यांचं आयुष्यभर पालन करायचं असतं. पण जर नवरी किंवा नवरदेव लग्नाच्य पहिल्या रात्रीच वचन तोडत असेल तर याचा परिणाम काय होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. याने नातं तुटणं याशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. मध्य प्रदेशच्या इंदुर शहरात काही दिवसांआधी अशीच एक घटना समोर आली. या घटनेमुळे नवरी आणि नवरदेवाच्या पायाखालची जमीन सरकली. ही कहाणी एका 'लुटेरी दुल्हन' आणि अशा घटना करणाऱ्या एका गॅंगची आहे. इंदुरमध्ये एका तरूणाचा धुमधडाक्यात लग्न करण्यात आलं होतं.
नवरदेवाने आपल्या नव्या नवरीबाबत अनेक स्वप्ने पाहिली होती. नवरदेवाने पहिली रात्र यादगार करण्यासाठी सगळी व्यवस्था केली होती. जेव्हा तो रूममध्ये पोहोचला तेव्हा नवरीने तिला पीरियड्स आल्याचं कारण दिलं आणि शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. नवरदेवाला वाईट वाटलं, पण त्याने तिचा विचार केला मनातील इच्छा दाबून ठेवल्या. काही दिवस होऊनही नवरीने नवरदेवाला हात लावू दिला नाही. नवरदेव हाच विचार करत होता की, काही दिवसांची गोष्ट आहे.
जेव्हा दोघांचं लग्न झालं तेव्हा घरात आनंदाचं वातावरण होतं. तिकडे नवरीने पीरियड्सचं कारण देत नवरदेवाला शरीराला हात लावण्यास नकार दिला. लग्नाच्या सात दिवसांनंतर नवरी अचानक घरातून गायब झाली. कुणालाच काही समजलं नाही. घरात शोधाशोध केली तर सोन्याचे दागिने आणि घरातील तीन लाख रूपयांची रोकड गायब होती. नवरदेवाच्या घरातील लोकांना संशय आला. ते लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी जे पाहिलं ते बघून हैराण झाले.
नवरदेवाकडील लोक जेव्हा लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या घरी पोहोचले तेव्हा रूममध्ये एजंट आणि नवरी आक्षेपार्ह स्थितीत दिसले. आधी तर त्यांना विश्वास बसला नाही. पण नंतर लगेच सगळं समजलं. ती काही सामान्य नवरी नव्हती, ती फसवणूक करण्यासाठीच आली होती. प्लान करून त्यांचं लग्न ठरवण्यात आलं होतं. संधी मिळताच नवरी दागिने आणि पैसे घेऊन फरार झाली होती. ती नवरदेवाच्या घरातून फरार होऊन आपल्या दलालाकडे पोहोचली आणि त्याच्यासोबत मजामस्ती करत होती. नवरदेवाकडील लोकांनी त्यांना पकडलं आणि त्यांचा भांडाफोड केला.