खंडवा – मासे पकडण्यासाठी एका मुलाने तलावात काटा टाकला मात्र त्यात काट्यात माशाच्या ऐवजी एक गाठोडं बाहेर आल्याने त्याला धक्का बसला. या गाठोड्यामध्ये चक्क ५०० आणि २ हजारांच्या नोटा होत्या. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील झाडांमध्ये नोटा विखुरल्या गेल्या तर उरलेल्या नोटा घेऊन मुलगा घरी परतला.
तलावाच्या शेजारील झाडांमध्ये पडलेल्या नोटांची बातमी गावात पसरल्यानंतर तलावाजवळ मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले. याची माहिती ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी सॅनिटायझेशन करुन नोटा ताब्यात घेतल्या. ही घटना खंडवा जिल्ह्यातील आरुंद गावातील आहे. गावातील एका माणसाच्या म्हणण्यानुसार एक वाहन चालक सकाळी तलावाच्या किनारी काहीतरी फेकून गेला होता. हे मॉर्निग वॉक करणाऱ्या ऋषि कनाडेने बघितले. पण त्याने गंभीरतेने घेतलं नाही.
ज्यावेळी युवक मॉर्निंग वॉक करुन पुन्हा परत होता तेव्हा त्याला तलावाच्या किनारी गर्दी जमा झाल्याची दिसली. त्यावेळी कोणी कपड्याच्या गाठोड्यात पैसे फेकून गेल्याचं त्याला समजलं. मासे पकडण्यासाठी गेलेल्या बालकाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलाने तलावात मासे पकडण्यासाठी काटा टाकला त्यावेळी माशाऐवजी नोटांनी भरलेले गाठोडं त्याच्या हाती लागलं. ज्यातील काही नोटा घेऊन तो घरी परतला.
बालकाच्या कुटुंबीयांनी घरातील नोटा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. ग्रामीण पोलीस चौकशीच्या आधारे तलावात पैसे फेकणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेत आहे. तलावाच्या काठावर पोलिसांना ५०० रुपयांच्या १२ नोटा तर २ हजारांच्या २ नोटा सापडल्या. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! कोरोनावर लवकरच लस मिळणार; जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा दावा!
केंद्र सरकारच्या लॉकडाऊन पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; मोदींच्या रणनीतीवर तज्ज्ञांचा गंभीर आरोप
...आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाल
“सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”
"आम्हाला जास्त काही नको, पण किमान पगार द्या"; डॉक्टरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र