जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्यांबाबत अनेक अजब गोष्टी ऐकायला मिळतात. यातील काही ठिकाणं अशी आहेत ज्यांबाबत वाचल्यावर तर हैराण व्हायला होतं. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत जिथे सगळ्या आधुनिक सुविधा असूनही तेथील पुरूष, महिला, वयोवृद्ध हे अंगावर कपडे न घालताच वावरतात. इथे अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे.
आम्ही तुम्हाला सांगतोय ब्रिटनच्या हर्टफोर्डशायरमधील एका गावाबाबत ज्याचं नाव आहे स्लीपप्लाट्स. गेल्या ८५ वर्षांपासून या गावातील लोक अंगावर एकही कपडा न घालतात राहतात. या गावातील लोक पूर्णपणे शिक्षित आहेत. त्यांच्याकडे धन-दौलत आहे.
तरीही लहान मुले, वयोवृद्ध, महिला आणि पुरूष कपडे न घालताच राहतात. आश्चर्याची बाब म्हणजे असं करण्यात कुणीही असहज नसतं. मीडिया रिपोर्टनुसार, या गावाचा शोध १९२९ मध्ये इसुल्ट रिचर्डसनने लावला होता. जेव्हा त्यांनी या गावाचा शोध लावला तेव्हा निर्णय घेतला की, ते चमकदार दुनिया सोडून या गावात येऊन राहतील.
या गावात पब, स्वीमिंग पूल क्लबची व्यवस्थाही आहे. इतकंच नाही तर जे लोक हे गाव बघायला येतात त्यांनाही या नियमांचं पालन करावं लागतं.
असं असलं तरी जर बाहेर मार्केटमध्ये जायचं असेल तर किंवा दुसरीकडे जायचं असेल तर लोक कपडे घालतात. तेच घरी परतल्यावर ते सगळे कपड्यांविना राहतात. तसेच जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हा कपडे घालू शकतात.
कोणत्याही कारणाने कपडे घालण्याची इच्छा होत असेल तर कपडे घालू शकतात. येथील लोक आपसात इतके मिसळले आहे की त्यांना या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही की ते विना कपड्यांचे आहेत. अनेक सामाजिक संस्थानी याचा विरोधही केला होता. पण नंतर विरोध बंद झाला.