तसं तर तुम्ही ए, बी, ओ, एबी...निगेटिव्ह-पॉझिटिव्ह अनेक ब्लड ग्रुपबाबत ऐकलं असेलच. पण जगात आणखी एक असा ब्लड ग्रप आहे जो फार कमी लोकांमध्ये आढळतो. आज आम्ही तुम्हाला एका अशा ब्लड ग्रुपबाबत सांगणार आहोत जो जगात सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप आहे.
जगातला सर्वात दुर्मीळ ब्लड ग्रुप आहे गोल्डन ब्लड. याला आरएच नल नावानेही ओळखलं जातं. हा ब्लड ग्रुप सर्वात दुर्मीळ असल्याने संशोधन करत असलेल्या वैज्ञानिकांनी याला गोल्डन ब्लड असं नाव दिलं आहे. दुर्मीळ असल्याकारणाने आणि कुणालाही देता येत असल्याने या ब्लड ग्रुपची किंमतही वाढते.
त्यामुळे रक्ताच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये या ब्लड ग्रुपला गोल्डन ब्लड म्हटलं जातं. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे या रक्तात कोणत्याही प्रकारचं एंटीजन आढळून येत नाही. सांगण्याचा अर्थ हा आहे की, हे रक्त कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला दिलं जाऊ शकतं.
यूएसच्या रेअर डिजीज इन्फॉर्मेशन सेंटरनुसार, गोल्डन ब्लड ग्रुप एंटीजनरहीत असतो त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात हे रक्त असतं त्यांना एनीमियाची तक्रार असू शकते. हेच कारण आहे की, अशा लोकांची माहिती मिळताच त्यांना डॉक्टर डाएटवर खास लक्ष देण्याचा सल्ला देतात. तसेच त्यांना आयर्न असलेले पदार्थ जास्तीत जास्त खाण्याचा सल्ला दिला जातो.
एका रिसर्चनुसार, हे गोल्डन ब्लड आतापर्यंत केवळ ४३ लोकांमध्ये आढळून आलं आहे. यात ब्राझील कोलंबिया, जपान, आयरलॅंड आणि अमेरिकेतील लोकांचा समावेश आहे. दुर्मीळ असल्याने आणि कोणत्याही ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला हे रक्त देता असल्याने डॉक्टर या लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. जेणेकरून गरज पडली तर हे रक्त त्यांच्याच कामी येईल.