Other world kingdom : जगभरात जास्तीत जास्त देशांमध्ये पुरूषांची सत्ता आहे. 21 व्या शतकातही महिलांना गुलामी सहन करावी लागते. पण बदलत्या काळात लोकांचे विचारही बदलत आहेत. आता महिला आणि पुरूष खांद्याला खांदा लावून काम करतात. पण जगात असाही एक देश आहे जिथे महिलांची सत्ता चालते. महिला इथे पुरूषांना गुलाम बनवून ठेवतात. पुरूषांना इथे जनावरांसारखं वागवलं जातं. त्यांना इथे महिलांच्या सॅंडल चाटून स्वच्छ कराव्या लागतात.
‘वुमन ओवर मेन’ अशी धारणा असलेला देश सगळ्यात विकसित देशांपैकी मानला जातो. हा देश यूरोपमध्ये आहे. या देशाचं नाव आहे ‘अदर वर्ल्ड किंगडम’. येथील शासन महिलांच्या हाती आहे. 1996 मध्ये चेक रिपब्लिकपासून वेगळा होऊन हा देश बनला. या देशाची एक महिला राणी आहे आणि तिचं नाव पॅट्रिसिया-1 आहे. इथे तिचीच सत्ता चालते. त्यांनी आपली वेगळी करन्सी, पोलीस आणि पासपोर्ट आहे. पण आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने या देशाला देशाची मान्यता दिलेली नाही. येथील मूळ नागरिक केवळ महिला आहेत. पुरूषांना नागरिकता मिळत नाही.
‘अदर वर्ल्ड किंगडम’चे नियम
‘अदर वर्ल्ड किंगडम’चे नियम जगापासून वेगळे आहेत. असं म्हटलं जातं की, जर कुणाला नागरिकता हवी असेल तर राणीच्या महालात कमीत कमी पाच दिवस गुलामी करावी लागते. त्यांना राणीच्या सगळ्या आदेशांचं पालन करावं लागतं. जर कुणी दुसऱ्या देशातून आलं तर त्यांना राणीसाठी सोफा बनवावा लागतो, दारू प्यायची असेल तर आधी दारू राणीच्या पायांवर टाकली जाते. त्यानंतरच गुलाम पिऊ शकतात.
कमीत कमी एक पुरूष गुलाम
राणी पॅट्रिसिया-1 ने या देशाची नागरिकता मिळवणाऱ्या महिलांसाठी काही नियम बनवले आहेत. जसे की, त्यांच्याकडे कमीत कमी एक पुरूष गुलाम असावा. महिला आपल्या सहमतीने त्याच्यासोबत संबंध ठेवू शकते. महिलेला कमीत कमी पाच दिवस राणीच्या महालात रहावं लागेल.
अदर वर्ल्ड किंगडमच्या सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. जे हे नियम पाळतील त्यांना 7.4 एकर जमिनीवर बनलेल्या या देशाची नागरिकता मिळू शकते. इथे काही इमारती, स्वीमिंग पूल, रेस्टॉरन्ट आणि नाइट क्लब आहेत. कैद्यांसाठी तुरूंगही आहेत.