शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

भारतातील या किल्ल्यात आहे जगातली दुसरी सगळ्यात मोठी भिंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 4:54 PM

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत ही चीनच्या भिंतीनंतर जगातली दुसरी सर्वात मजबूत आणि लांब भिंत आहे.

The Great Wall China' म्हणजे चीनची भिंत आपल्या लांबी आणि मजबूतीसाठी जगभरात लोकप्रिय मानली जाते. पण जगातली दुसरी सर्वात लांब आणि मजबूत भिंत कोणती आहे? नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबाबत सांगणार आहोत. जगातली दुसरी सर्वात लांब आणि मजबूत भिंत ही राजस्थानच्या कुंभलगढ किल्ल्याची भिंत मानली जाते. 

राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगढ किल्ल्याची भिंत ही चीनच्या भिंतीनंतर जगातली दुसरी सर्वात मजबूत आणि लांब भिंत आहे. साधारण ३६ किमी लांब ही भिंत तोडणं कुणालाही जमलं नाही. सम्राट अकबर सुद्धा ही भिंत तोडण्यास अपयशी ठरला होता.

९ मे १५४० मध्ये महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्या झाला होता. कुंभलगढ एकाप्रकारे मेवाडची संकटकालिन राजधानी मानला जातो. या किल्ल्यावर अनेक वर्ष राजपूत लोकांनी राज्य केलं. राजस्थानच्या सर्वात प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक कुंभलगढ किल्ला उदयपूर पासून ८२ किलोमीटर दूर अरावलीच्या डोंगरावर तयार केला आहे.

१४४३ मध्ये राणा कुंभने किल्ल्याचं निर्माण केलं होतं. यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने राणा कुंभा यांनी किल्ल्याच्या चारही बाजूने भिंत तयार करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा या भिंतीचं काम सुरू झालं तेव्हा ते थांबण्याचं नावच घेत नव्हतं. नंतर काम पूर्ण झालं.

या ऐतिहासिक किल्ल्याच्या भिंतीची शानदार बनावट पाहून या भिंतीला 'भारताची महान भिंत' असं दर्जा देण्यात आला. सुरक्षेच्या दृष्टीने ही भिंत गुप्त ठेवली गेली होती. समुद्र सपाटीपासून १९१४ मीटर उंचीवर असलेल्या अरावली डोंगरात तयार केलेल्या या भिंतीबाबत सांगितलं जातं की, यावर एकत्र अनेक घोडे धावू शकतात. हजारो दगडांपासून तयार केलेल्या भिंतीची रूंदी १५ मीटर आहे.

किल्ल्यात ३६० मंदिरे

कुंभलगढ किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ७ दरवाजे तयार केले आहेत. ज्यात राम द्वार, पग्र द्वार, हनुमान द्वार इत्यादी प्रसिद्ध आहेत. या किल्ल्याच्या आता एकूण ३६० मंदिरांचा समूह आहे. ज्यात ३०० जैन मंदिरे आणि ६० पेक्षा अधिक हिंदू मंदिरे आहेत. 

कुंभलगढ किल्ल्याच्या चारही बाजूने रात्री मशाली पेटवल्या जातात. ज्यामुळे हा किल्ला रात्री उजळून निघतो. दररोज पर्यटकांना इथे सुंदर नजारे बघायल मिळतात. डोंगराच्या टोकावरून या किल्ल्याचा नजारा फारच सुंदर दिसतो.

या भिंतीच्या चारही बाजूने भलेही वाळवंट दिसत असेल, पण भिंत आजही मजबूतीने उभी आहे. शेकडो वर्षांपासून या भिंतीला काहीच झालेलं नाही. कुंभलगढ किल्ल्याच्या चारही बाजूने असलेल्या या भिंतीला कुंभलगढची 'सिटी वॉल' म्हटले जाते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके