Airplane Mileage : पेट्रोलचा भाव सध्या आसमानाला भिडले आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे लोक हैराण झाले आहेत. पण लोकांनी गाडी चालवणं काही थांबवलं नाहीये. सामान्यपणे लोक चांगल्या मायलेजच्या गाडीला प्राधान्य देतात. एखाद्या कोणत्याही गाडीचा मायलेज 35 ते 45 किमी प्रति लिटर इतका किंवा त्यापेक्षा थोडा जास्त असतो. तर काही गाड्यांचा मायलेज 15 ते 20 पर्यंत असतो.
पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जास्तीत जास्त लोकांकडे नसतं. कारण त्यांनी याचा कधी विचारच केलेला नसतो. अशात आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत.
तुम्हाला कल्पना असेल की, इतर वाहनांच्या तुलनेत विमानाचं इंजिन अधिक मजबूत आणि मोठं असतं. जे इंधनावरच चालतं. पण हे इंधन पेट्रोल आणि डीझलपेक्षा वेगळं असतं. भारताबाबत सांगायचं तर आपल्याकडे विमानासाठी जेट फ्यूल नावाच्या इंधनाचा वापर केला जातो. तर याच्या प्रति लिटरची किंमतही वेगवेगळी असते.
बोइंग 747 सर्वात मोठ्या विमानांपैकी एक आहे. ज्यात एकाचवेळी 500 प्रवाशी प्रवास करू शकतात. या विमानाच वेग 900 किमी प्रति तास सांगितला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, बोइंग 747 विमानात एक सेकंदात चार लीटर इंधन खर्च होतं.बोइंग 747 सारखे मोठे विमान एक मिनिटात 240 लिटर इंधन खर्च करतात. तेच असे विमान एका लिटरमध्ये केवळ 0.8 किमीपर्यंत प्रवास करू शकतात.
तसेच बोइंग ७४७ च्या तुलनेत एअरबस A32 विमान एका सेकंदात 0.683 लिटर इंधन खर्च करतात. त्यासोबतच बोइंग विमान एका तासात 14.400 लीटर इंधन खर्च करतं.
एका अंदाजानुसार, टोकियो ते न्यूयॉर्कपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एका बोइंग 747 विमानाला 187,200 लिटर इंधनाची गरज पडते. टोकियो ते न्यूयॉर्कचा प्रवास 13 तासांचा आहे.