Candi sukuh temple Indonesia : पौराणिक कथांमध्ये समुद्र मंथन ही फार महत्वाची घटना मानली जाते. ज्यातून एक अमृत कलश निघालं होतं ज्याबाबत खूप बोललं जातं. तर काही लोकांना यावर गाढ विश्वास आहे. समुद्र मंथनातील अमृत कलशाबाबत सगळ्यांनाच माहीत आहे. पण मग ते गेलं कुठे? तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मुस्लिम देश इंडोनेशियातील एका मंदिरात हे समुद्र मंथनातून निघालेलं अमृत कलश आहे अशी मान्यता आहे.
इंडोनेशियातील या मंदिराचं नाव कंडी सुकुह आहे आणि हे मंदिर मध्य आणि पूर्व प्रांत जावाच्या सीमेवर माउंट लावू येथे आहे. या प्राचीन मंदिरात एक असा कलश आहे, ज्यात एक द्रव्य हजारो वर्षांपासून तसंच आहे. असं मानलं जातं की, हा अमृत आहे जे हजारो वर्षापासून कधीही नष्ट झालं नाही.2016 साली इंडोनेशियाच्या पुरातत्व विभागाने या मंदिराची डागडुजी केली होती. तेव्हाच या मंदिराच्या भींतीत संशोधकांना एक तांब्याचं कलश सापडलं. यावर एक पारदर्शी शिवलिंग आहे आणि कलशाच्या आत द्रव्य आहे.
काही शोधातून असं समोर आलं की, तांब्याचा कलश असा जोडण्यात आला आहे की, कुणीही उघडू शकणार नाही. आणखी एक हैराण करणारी बाब म्हणजे ज्या भींतीमध्ये हा कलश मिळाला त्यावर समुद्र मंथनाची चित्रे काढलेली आहेत. तसेच महाभारतातील काही उल्लेखही आहेत.
असंही मानलं जातं की, तांब्याचा हा कलश इसपूर्व 1 हजार मधील आहे. तर मंदिर ईसपूर्व 1437 मध्ये तयार करण्यात आलं होतं. या काळात मलेशिया पूर्णपणे हिंदू राष्ट्र होता. पण 15व्या शतकात जेव्हा इंडोनेशियामध्ये मुस्लिम वर्चस्व वाढलं तेव्हा या मंदिराची तोडफोड करण्यात आली. असं मानलं जातं की, तेव्हापासूनच कलश या मंदिरात लपवून ठेवला आहे.