आपल्यापैकी अनेकांना प्राण्यांची आवड असते. आपण एखादा प्राणी पाळावा असेही आपल्याला बऱ्याचदा वाटते. अशावेळी पहिली पसंती ही श्वानांना असते. असे म्हणतात की, श्वान लगेचच माणसांमध्ये मिसळून जात असून ते आपल्या मालकाशी इमानदार असतात. त्याचप्रमाणे श्वान दयाळू असतात. ते प्रत्येक परिस्थितीत आपल्या मालकासोबत असतात. श्वानांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात. त्याचप्रमाणे अनेकदा ब्रिडींग करूनही वेगळ्या प्रजाती केल्या जातात. पण या सर्व प्रजातींमध्ये अनेकांना आवडणारी प्रजाती म्हणजे जर्मन शेफर्ड. जाणून घेऊयात जर्मन शेफर्ड श्वानांच्या माहीत नसलेल्या गोष्टी...
1. जर्मन शेफर्ड ही श्वानांची ब्रिडींग केलेली प्रजाती आहे. ही प्रजाती 1899 मध्ये अस्तित्वात आली असून त्यांचा मूळ देश जर्मनी आहे.
2. जवळपास 100 पेक्षा जास्त श्वानांच्या प्रजातींवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, सर्व प्रजातींपैकी सर्वात बुद्धीमान श्वानांमध्ये जर्मन शेफर्डचा तिसरा क्रमांक लागतो. हा श्वान आपल्या समस्यांवर स्वतःच तोडगा काढतो.
3. एका निरोगी जर्मन शेफर्ड श्वानाचे आयुष्य 11 ते 14 वर्षांचे असते.
4. या श्वानाची हुंगण्याची क्षमता इतर श्वानांच्या तुलनेत अधिक असते. या प्रजातीच्या श्वानांच्या नाकामध्ये 225 मिलियन सेंट रिसेप्टर्स असतात. त्यामुळे ते हवा आणि जमिनीवरील कोणत्याही गोष्टीला चांगल्या प्रकारे हुंगू शकतात.
5. या प्रजातीतील श्वान वेगवेगळे रंगांमध्ये आढळतात. जास्तीत जास्त पांढरा, काळा, राखाडी या रंगांमध्ये आढळतात.
6. जर्मन शेफर्ड फार धोकादायक असतात. एखाद्या व्यक्तिला चावला तर त्याच्या हाडापर्यंत जखम होऊ शकते. अथवा त्याचे हाडही मोडू शकते.
7. बुद्धीमान असल्यामुळे जगभरातील पोलीस आणि आर्मी दलांमध्ये या प्रजातींच्या श्वानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना त्या अनुषंगाने काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येते. या श्वानांचा समावेश बॉम्ब निकामी पथकांमध्येही करण्यात येतो.
8. हे श्वान कोणतेही काम पटकन शिकतात. फक्त 5 वेळा एखादी गोष्ट सांगितल्याने ते ती गोष्ट शिकतात.
9. या प्रजातीचे श्वान फक्त आपल्या मालकाने सांगितलेल्या गोष्टीच ऐकतात.
10. एका उदाहरणावरून यांच्या इमानदारीचा अंदाज बांधता येवू शकतो. एक 15 वर्षांचा जर्मन शेफर्ड आपल्या मालकाच्या निधनानंतर तिथेचं कब्रिस्थानमध्ये राहत असे. कालांतराने तिथेच त्याचेही निधन झाले.