इराकमध्ये एका बाळाने तीन गुप्तांगासोबत जन्म घेतल्याची विचित्र घटना समोर आली आहे. डॉक्टर म्हणाले की असा प्रकारची केस त्यांनी पहिल्यांदाच पाहिली. ज्यात एका बाळाला एकापेक्षा जास्त प्रायव्हेट पार्ट आहेत. सामान्यपणे हाताचे किंवा पायांची बोटांची संख्या वाढते किंवा कमी होत असते. मात्र, प्रायव्हेट पार्टबाबत अशी केस पहिल्यांदाच पाहिली.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, या बाळाचा जन्म इराकच्या उत्तर भागातील मोसुलमध्ये झाला आहे. डॉक्टरांनुसार, या मुलासोबत चमत्कारच झाला आहे. या बाळाचं तीनपैकी एक गुप्तांग २ सेमी लांब आहे. दुसरं एक सेमी लांब आहे. हे मुख्य गुप्तांगासोबत जुळून आहेत. ही घटना सामान्य नाही. म्हणजे हे बाळ कोणत्याही शारीरिक कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. अशात डॉक्टरांचं मत आहे की, त्याचे दोन गुप्तांग ऑपरेशन करून काढले जातील. असं प्रेग्नेन्सीदरम्यान झालेल्या एखाद्या अडचणीमुळे होऊ शकतं. किंवा यासाठी आनुवांशिकही काही कारण असू शकतं.
या बाळाचा तीन गुप्तांगासोबत झालेला जन्म दुर्मीळ आहे. पण ही पहिली घटना नाहीये. याला सुपरनूमेररी असं म्हणतात. जगभरात ५० ते ६० लाख बाळांच्या जन्मात अशी एक केस बघायला मिळते. आतापर्यंत जगात दोन गुप्तांगासोबत जन्माला आलेल्या केसेस १०० आहेत. मात्र, तीन गुप्तांगासोबत कुणाचा जन्म होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (हे पण वाचा : चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण..)
इराकमधील या बाळाच्या केसला वैज्ञानिकांनी ट्रायफालिया असं नाव दिलं आहे. याबाबत एक इंटरनॅशनल केस स्टडीही प्रकाशित झाला आहे. जो इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये प्रकाशित झाला आहे. अशीच एक केस भारतात २०१५ मध्ये समोर आली होती. पण त्या केसमध्ये जास्त माहिती समोर आली नव्हती.