पृथ्वीवर अनेक अशी रहस्यमई ठिकाणे आहेत, ज्याची आपल्या सर्वांना माहितीदेखील नाही. अनेक वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेली अनेक ठिकाणी काळानुरुप बदलली किंवा नष्ट झाली. अशाच प्रकारची एक घटना पॅसिफिक महासागरात घडली आहे. शेकडो वर्षापासून पॅसिफिक महासागरात असलेले एक बेट अचानक गायब झाले आहे.
तुमचाही विश्वास बसणार नाही, पण ही घटना घडली आहे. 1774 मध्ये पहिल्यांदा जेम्स कुक (James Cook) नावाच्या एका व्यक्तीने पॅसिफिक महासागरातील हे बेट सापडल्याचा दावा केला होता. त्या बेटाला 'सँडी आयलंड' म्हणून ओळखले जाऊ लागले. पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी असल्याचे या आयलंडवर कुणीच राहत नव्हते म्हणून त्याला 'फॅंटम आयलंड' असेही म्हटले गेले. काही दिवसांपूर्वीपर्यंत हे बेट गुगल मॅपवरही दिसत होते. पण नंतर जेव्हा संशोधकांनी हे बेट नसल्याचे उघड केले तेव्हा गुगलनेही ते मॅपवरुन काढून टाकले.
अनेक ठिकाणी बेटांचे पुरावेऑस्ट्रेलियाच्या किनार्याजवळ पॅसिफिक महासागरात असलेल्या सँडी बेटाचा दावा जेम्स कुकने 1774 साली केला होता. जेम्स कुकने सांगितल्यानुसार, या बेटाची लांबी सुमारे 22 किलोमीटर आणि रुंदी 5 किलोमीटर होती. 1876 मध्ये वेग नावाच्या जहाजानेही सँडी बेट अस्तित्वात असल्याचा दावा केला होता. 19व्या शतकात बिट्रेन आणि जर्मनीच्या नकाशांमध्येही हे बेट असल्याचा दावा करण्यात आला होता.
बेट अस्तित्वात नसल्याचे आढळलेनंतरच्या काळात अनेकांनी या बेटाच्या अस्तित्वावर संशयही व्यक्त केला. फ्रेंच हायड्रोग्राफिक सर्व्हिसने हे बेट 1979 पासून त्याच्या नॉटिकल चार्टमधून काढून टाकले. तर, 22 नोव्हेंबर 2012 रोजी ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांना आढळले की हे बेट अस्तित्वात नाही. यादरम्यान शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी समुद्राची खोली मोजण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान ही खोली 4 हजार 300 फुटांपेक्षा जास्त नसल्याचे आढळून आले.