Sun Does Not Set At This Place : दिवस आणि रात्रीचं चक्र हे आपल्या दैनंदिन जीवनासाठी आणि आरोग्यासाठी किती महत्वाचं असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे. जर रात्र झाली नसती तर आपण आराम कधी केला असता किंवा दिवस उजाडला नसता तर कामे कशी केली असती? दिवस आणि रात्रीच हे चक्र नसतं तर, जगणं अवघड झालं असतं. पण जगात असेही काही ठिकाणं आहेत जिथे काही महिने दिवस आणि रात्र होतंच नाही.
नॉर्वेमध्ये एक असं आयलॅंड आहे जिथे वर्षातले असे काही दिवस असतात ज्यात सुर्यास्तच होत नाही. विचार करा की, जर सूर्यास्त झाला नाही तर रात्र होणार नाही मग लोक आपली कामे किंवा आराम कसे करणार. निसर्गाचा हा अनोखा करिश्मा आर्कटिक सर्कलमध्ये असलेल्या Sommarøy आयलॅंडवर बघायला मिळतो.
70 दिवस 24 तास असतो सूर्य
या ठिकाणी मे पासून ते जुलैपर्यंत एकूण 70 दिवस असे असतात ज्यात सूर्यास्तच होत नाही. पुढील तीन महिने असेच असतात की, सूर्योदय होत नाही. म्हणजे 70 दिवस 24 तास दिवस असतो आणि पुढील 3 महिने फक्त अंधार असतो. निर्सगाच्या या अनोख्या गोष्टीचा अनुभव इथे राहणारे 300 लोक घेतात. त्यांच्यासाठी हे फार अवघड असतं. अशात या लोकांची मागणी आहे की, त्यांच्या या भागाला जगातला पहिला टाइम फ्री झोन घोषित करावा.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, येथील लोक टाइम फ्री झोनसाठी कॅम्पेन चालवत आहेत. त्यांच्यानुसार, 70 दिवस त्यांच्यासाठी वेळेचा काहीच अर्थ नसतो. ते रात्रीच्या दोन वाजताही घराला पेंट करू शकतात. सकाळी चार वाजता कोणतंही काम करू शकतात. येथील लोक त्यांच्या कामासाठी घड्याळाचा वापरच करत नाहीत. ते घड्याळानुसारच चालतच नाहीत.